रिलायन्स जीओ च्या वतीने मोबाईल टॉवर संबंधी अग्नी प्रतिबंध सुरक्षा अभियानाचे आयोजन
मुंबई २२ सिटी न्यूज नेटवर्क
रिलायन्स जिओ महाराष्ट्राच्या वतीने राज्यात मोबाईल टॉवर ला लागणाऱ्या आगी पासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अग्नी प्रतिबंध सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले . संपूर्ण दोन महिने चाललेल्या या अभियानाची सांगता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी होणार आहे.
फिल्ड वर काम करणारे कर्मचारी आणि वेंडर्स यांमध्ये काम करताना आगीसंदर्भात काळजी कशी घ्यावी, त्या संदर्भातले प्रतिबंधात्मक उपाय आणि जागरूकता निर्मान करणे हा या अभियानाचा हेतू आहे. यावेळी कर्मचारी आणि व्हेंडर्स याना शून्य अपघात, आग आणि शून्य दुखापत हे उद्दिष्ट कसे प्राप्त करता येईल याविषयी माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले . पीपीई किट, पॉवर कनेक्शन्स , टॉवर बॅटरी ची काळजी , स्विच चेंज ओव्हर , इलेक्ट्रिक फायर याविषयी सुरक्षा बॅनर , पोस्टर प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले . यावेळी महाराष्ट्राचे सेफ्टी हेड, वरिष्ठ अधिकारी आणि सर्व फिल्ड कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment