दैनिक राशिभविष्य
सोमवार, ३० ऑक्टोबर २०२३.
अश्विन कृष्ण द्वितीया. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - कृतिका. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष/वृषभ.
"आज कृतिका वर्ज्य दिवस"
मेष:- दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या घटना घडतील. सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. कलाकारांना यश लाभेल.
वृषभ:- सुरुवात संथ होणार आहे. लवकरच कामास गती प्राप्त होईल. नोकरीत काही विलक्षण बदल घडतील.
मिथुन:- सकाळची सुरुवात चांगली होणार आहे. कामेपूर्ण करा. नंतर मात्र नियोजन बदलेल.
कर्क:- संथ सुरुवात झाली तरीही नंतर कामाचा वेग वाढेल. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील.
सिंह:- नोकरी/व्यवसायात बदल संभवतात. अधिकारांची वाटणी होईल. जागा बदलेल.
कन्या:- संथपणे सुरुवात होईल. आळस वाढेल. मात्र नंतर वेग वाढेल. आरोग्य सांभाळावे लागेल.
तुळ:- सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करून घ्या. नंतर नियोजन बिघडेल. शेअर्स मधून नुकसान संभवते.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. कामाचा आनंद घ्याल. उत्साह वाढेल. गती प्राप्त होईल.
धनु:- तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. कामे मार्गी लागतील. सुरुवात चांगली होईल. अंदाज अचूक येतील.
मकर:- कौटुंबिक वाद सुटतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. जामीन राहू नका.
कुंभ:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. सकारात्मक अनुभव येतील. उत्तरार्ध विश्रांतीचा.
मीन:- अनुकूल दिवस आहे. नवीन अनुभव येतील. चंद्र -शनी केंद्र योग तुम्हला अंतर्मुख करेल. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment