आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी मिळावा यासाठी मनसेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन


 आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी मिळावा यासाठी मनसेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन



कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क 

 आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी मिळावा यासाठी मनसेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

10 नोव्हेंबर पासून रेशन धान्य दुकानातून आनंदाचा शिधा वाटप करू असे आश्वासन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिले

राज्य सरकारने दिवाळीसाठी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला परंतु नेहमीप्रमाणे त्यासाठी लागणारे टेंडर काढायला वेळ घालवला त्यामुळे आनंदाचा शिधा अजून शहर आणि तालुक्यात पोहोचलेला नाही मागील वर्षी सुद्धा असाच गोंधळ राज्य सरकारने घातला होता दिवाळी झाली तरी लोकांना आनंदाचा शिधा मिळाला नव्हता पण यावेळी दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिरा गोरगरीब सामान्य लोकांना वेळेत न मिळाला तर धान्य गोदामात शिरून  आनंदाच्या शिऱ्याचे वाटप करून असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात येत आहे आनंदाचा शिधा यामध्ये सहा वस्तू देण्यात येणार आहेत परंतु अजून सुद्धा दोन वस्तू उपलब्ध झालेले नाहीत एकाच वेळी सर्व वस्तू पिशवीतून वाटप कराव्यात त्यासाठी पिशव्यांची उपलब्धता जिल्ह्यामध्ये नाही याचे सखेद आश्चर्य वाटले

     जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याशी वरील विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली असता त्यांनी सांगितले दोन ते तीन दिवसांमध्ये आनंदाचा शिधा असणाऱ्या गाड्या लोड होत आहेत. पाच नोव्हेंबर पर्यंत गोडाऊन मध्ये आनंदाचा शिधा पोहोचेल आणि त्यानंतर तिथून दुकानांपर्यंत तातडीने पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. 10 तारखेपासून आनंदाचा शिधा वाटप करण्याचे निश्चित केलेले आहे व तसे नियोजन आमचे आहे. दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा देण्याचा आम्ही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  संजय पाटील, राजू दिंडोर्ले ,प्रसाद पाटील ,विजय करजगार ,निलेश धुम्मा ,अजिंक्य शिंदे गणेश शिंदे यांनी निवेदन दिले


Comments