दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 सोमवार, २३ ऑक्टोबर  २०२३. 






अश्विन शुक्ल नवमी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


चंद्र नक्षत्र - श्रवण  आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर. 


"आज उत्तम दिवस" *नवमी उपवास* 


मेष:- सकाळची वेळ धावपळीची ठरणार आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. दानधर्म घडेल.

     

वृषभ:- धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चात वाढ होईल. तीर्थयात्रा घडेल. आर्थिक लाभ देखील होतील.    

 

मिथुन:- फारसा अनुकूल दिवस नाही. दिवसाची सुरुवात संथ होईल. आरोग्याची काळजी घ्या.  


कर्क:- नोकरीत होणाच्यात्रासाचे परिणाम घरात दिसतील. तरंग करू नका. ध्यानधारणा करा. 

 

सिंह:- आर्थिक बाजू चांगली राहील. मात्र प्रवासात त्रास होऊ शकतो. तीर्थाटन कराल. 

  

कन्या:- संमिश्र दिवस आहे. फारशी अपेक्षा ठेवू नका नेहमीची कामे चालू ठेवा. नवीन करार नकोत.   

 

तुळ:- नोकरीचा तरुण जाणवेल. संध्याकाळ चिंता निर्माण करणारी असु शकते. गृहकलह टाळा.

 

वृश्चिक:- आर्थिक अनुकूलता आहे. कामे पूर्ण करा. नोकरांच्या कडून त्रास शकतो.


धनु:- शेअर्स मध्ये गुंतवणूक टाळा. अचानक खर्च वाढतील. संततीची चिंता वाटेल.  

 

मकर:- घरात राहून आराम करणे हिताचे आहे. उत्साहाला आवर घाला. काही सुखद प्रसंग घडतील.        

 

कुंभ:- व्यय स्थानात चंद्र आहे. विनाकारण खर्च वाढतील. राजकीय भाष्य टाळा. काळजी घ्या.

 

मीन:- उत्तम लाभ होतील. अंदाज अचूक ठरतील. उत्साह वाढेल. मात्र उन्माद नको.  


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही कायडप्रेमी आहात. प्रत्येक विषयाची सखोल माहिती असावीयास तुमचा हट्ट असतो. आध्यत्मिकआणि व्यावहारिक आशादोन्ही गोष्टी आवडतात. तुम्ही शांतताप्रिय आहात. प्रवास, कला, संगीत, वाङ्मय यांची आवड असते. पाण्याजवळ भाग्योदय होतो. इतरांची परीक्षा चटकन करण्याचे ज्ञान तुम्हाला असते. भित्र्या लोकांशी तुमचा संबंध येतो. फारशी बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. हातचे राखून बोलतात आणि वागतात. तुम्ही चाणाक्ष असून निरीक्षण शक्ती चांगली असते. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते. तुम्ही स्वतः कलाकार असून कला प्रिय देखील आहात. मनाने तुम्ही उदार आणि विचारी असून इतरांची कदर करतात. तुमच्या सानिध्यात आल्यास इतरांना आनंद होतो. तुमचे वागणे आणि बोलणे मोहक आणि आकर्षक आहे. तुम्ही समजूतदार असून विविध खेळांमध्ये यश मिळते. इतरांचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर हेरतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगायची तुम्हाला बरीच हौस असते. तुमचे उद्दिष्ट ठाम असते आणि त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, वाहने, घरे, दाग दागिने आणि सुगंध द्रव्य तुम्ही वापरत असतात. विविध समारंभांमध्ये भाग घेणे आणि समाजात मिसळणे तुम्हाला आवडते. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. इतरांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. धर्म आणि तत्वज्ञान तसेच प्रवास याची तुम्हाला आवड आहे. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते. दुर्बल लोकांवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकतात. 


व्यवसाय:-  अकाउंट, बँकिंग, दळणवळण, वाहन विक्री, इलेक्ट्रॉनिक्स, दागिने विक्री, कपडे, कॉस्मेटिक्स.


शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.


शुभ रंग:- पांढरा, निळा, हिरवा.


शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments