दैनिक राशिभविष्य
गुरूवार, २६ ऑक्टोबर २०२३.
अश्विन शुक्ल द्वादशी. शरद ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज उत्तम दिवस" प्रदोष
चंद्र नक्षत्र - पूर्वा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. व्यवसायात काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) चांगला दिवस आहे. कामे पूर्ण होतील. सरकारी कामात मात्र दिरंगाई जाणवेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरी/व्यवसायात काही अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वरिष्ठ नाराज होऊ शकतात. काळजी घ्या. मनापासून काम करा. प्रवास घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्यचे प्रश्न निर्माण होतील. सरकारी कामातून त्रास जाणवेल. नियोजन बदलेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यावसायिक कटकटी निर्माण होऊ शकतात. चोरीचे भय आहे. मेहनत वाढवावी लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. कायदे कटाक्षाने पाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) धाडसी स्वभाव उफाळून येईल. सहल घडेल. विद्यार्थ्यांना यश लाभेल. नियोजन बदलेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) शेजाऱ्यांशी संवाद साधावा लागेल. नमते घ्या. सरकारी कामात चालढकल नको.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अर्थकारण सुधारेल. नवीन संधी चालून येतील. कामे पार पडतील. राजकीय यश मात्र दूर आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सौख्य लाभेल. संपत्ती वाढेल. मान सन्मानाचे प्रसंग येतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अडचणी दूर होतील. मार्ग सापडेल. विश्वास वाढेल. महत्वाकांक्षी स्वभाव उफाळून येईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
२६ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनी, चंद्र आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही भावनाशील असून चंचलता, अस्वस्थपणा नीटनेटके पणा, सौंदर्य यांची आवड असते. मित्र मैत्रिणींचा सहवास तुम्हाला प्रिय असतो. तुमच्यात उत्स्फूर्तपणा असतो. तुम्ही उत्कृष्ट संघटक, महत्वाकांक्षी, क्रियाशील व्यक्ती आहात. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होतात आणि लोक कल्याण साठी झटतात. गूढ विद्या, हिप्नॉटिझम यांची आवड असते. ठराविक चाकोरीतून जाणे तुम्हाला आवडत नाही. जीवनात बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत. शिस्त, गांभीर्य, दृढपणा तसेच कर्तव्याची जाणीव तुमच्यात प्रामुख्याने आढळून येते. तुम्ही सखोल विचारांचे आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुम्ही समतोल विचार करतात आणि कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेतात तरी देखील तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात. निसर्ग, सौंदर्य, संगीत, फुलं यांची तुम्हाला आवड असते. चार चौघांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी आणि बुद्धिमान आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून कार्य मग्न असतात. तुम्ही कार्यक्षम आणि अधिकार गाजवणारे आहात. तुम्हाला तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांबद्दल आपुलकी आणि आदर असतो. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. व्यवहारातील सर्व गोष्टी तुम्ही सुलभतेने हाताळू शकतात. आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन उत्तम असते. इतरांच्या समस्या आणि दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. तुम्ही इतरांसाठी एक आदर्श असतात. आयुष्यात अनेक बाबतीत तुम्हाला विलंब सहन करावा लागतो. ८ हा अंक लाभदायक ठरल्यास अकस्मात खूप पैसा मिळू शकतो.
व्यवसाय:- वैद्यकीय शास्त्र, गणिती, कंपनी सेक्रेटरी, संशोधन, वैचारिक लेखन, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, व्यवस्थापक व उद्योग क्षेत्र, बौद्धिक क्षेत्र.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- राखाडी, काळा, जांभळा, गडद निळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
Comments
Post a Comment