दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 रविवार, २२ ऑक्टोबर २०२३. 






अश्विन शुक्ल अष्टमी. शरद ऋतू. दक्षिणायन. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे" *अष्टमी उपवास, दुर्गष्टमी*


चंद्रनक्षत्र - उत्तरा आषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) काही चांगल्या घटना घडतील. येणीवसूल होतील. मात्र शत्रू प्रबळ होतो आहे. काळजी घ्या.  

      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक स्थिती भक्कम राहील. मात्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. प्रवासात त्रास.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक आरोग्य जपावे लागेल. मुश्किल कालावधी आहे. संयम ठेवा.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) घरगुती कामात वेळ जाईल. पत्नीशी मतभेद टाळा. कुटुंबाला समजून घ्या.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कार्तिक बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात. चांगल्या संधी चालून येतील. भौतीक सुखे लाभतील. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अचानक लाभाचे योग आहेत. खर्चात वाढ होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल. 

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कसोटीचा काळ आहे. तुमच्या राशीत रवी, मंगळ, बुध, केतू आहेत. संयम ठेवा. काळजीपूर्वक निर्णय घ्या.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यय स्थानातील ग्रहांच्या गर्दीमुळे संभ्रम निर्माण होईल. घाईने निर्णय घेऊ नका. 

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम ग्रहमान आहे. राजकीय खेळी यशस्वी होतील. आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामाच्या ठिकाणी नवनवीन अनुभव येतील. स्पर्धा जाणवेल. महत्वाकांक्षा वाढीस लागतील.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सप्तमात शुक्र गुरुषी शुभ योग करत आहे. सिद्ध हस्त लेखन होईल. मोठे करार घडतील.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज नकोत. संयम आवश्यक आहे.  


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)


 २२ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर हर्षल आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची शरीरयष्टी चांगली असून डोळे सुंदर असतात. स्वभावात अस्थिरता असते. अनेकदा तुम्ही अनाकलनीय वागतात. भिन्नलिंगी व्यक्तींपासून लाभ होतात. मित्र परिवार फारच छोटा असतो. भांडणे होतात मात्र त्याची फिकीर नसते. आयुष्याचा पूर्वार्ध कष्टप्रद असतो मात्र नंतर सुख आणि सफलता लाभते. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आणि चिकाटी असते. कन्त्यही अडचणींवर तुम्ही मात करतात. प्रकृती सुदृढ आणि विकारवश असते. जीवनात अनेक उलाढाली होतात. स्मरणशक्ती चांगली असते. तुमच्या योजनांमध्ये वारंवार बदल होतात. जीवनात जे मिळवायचे ते शांतपणे मिळवतात. गाजावाजा केलेला आवडत नाही. हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. जीवनात बरेच चढउतार येतात. विलक्षण घटना घडतात. तुम्ही अत्यंत उत्साही प्रगतिशील आहात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला तोंड देऊ शकतात. तुम्ही बुद्धिमान, चतुर, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला रूढी, परंपरा फारशा आवडत नाहीत. तसेच खोटेपणा देखील आवडत नाही. तुम्ही समाजप्रिय आहात आणि तुमच्या व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्हाला नवीन नवीन वस्तूंची तसेच प्रवासाची आवड आहे. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा ठामपणा असतो. आयुष्यात तुम्ही सतत बदल करत असतात. तुमचा मित्र परिवार देखील सतत बदलत असतो. हुशार अन बुद्धिमान वर्तुळात वावरणे तुम्हाला आवडते. मनावर घेतल्यास जीवनात अशक्य असे काहीच राहत नाही. तुमच्या कर्तृत्वाला लवकर मान्यता मिळते. वयाच्या ४० ते ६० मध्ये महत्वाच्या घटना घडतात.


व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, बँकिंग, आयात निर्यात, शास्त्र, तसेच स्पेशालिस्ट डॉक्टर, संशोधन.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.


शुभ रंग:- निळा, पिवळा, नारंगी, राखाडी.


शुभ रत्न:- पोवळे, मोती, हिरा.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments