इचलकरंजीतील २० वर्षीय ऋषीकेश मंगेश घट्टे याची नेव्हीत निवड
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
इचलकरंजीतील ऋषीकेश मंगेश घट्टे याची नेव्हीत निवड झाली आहे. अवघ्या २० व्या वर्षी त्याची निवड झाल्याने त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या या यशाबद्दल रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आणि उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या हस्ते ऋषीकेशचा सत्कार करण्यात आला.ऋषीकेश घट्टे हा रेशन धान्य दुकानदार मंगेश घट्टे यांचा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्याला नेव्हीची आवड होती. यामुळे ध्येय डोळयासमोर ठेवून त्यांने नेव्हीचा अभ्यास सुरु केला होता. इचलकरंजीतील डीकेटीई कॉलेजमध्ये १२ वीं विज्ञान शाखेतून त्यांने शिक्षण घेतले. यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांने नेव्हीची परीक्षा दिली. या परीक्षेत दत्तीर्ण होऊन त्याची नेव्हीतील एसएसआरपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या हस्ते आणि संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी मोहिनी चव्हाण यांनी त्याच्या यशाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंगेश घट्टे इचलकरंजी अध्यक्ष पांडुरंग सुभेदार, कागल अध्यक्ष संदीप लाटकर, सचिव सातापा शेणवी, सुरज सुभेदार, संदीप डांगे, जिल्हा तांत्रिक कर्मचारी करण गायकवाड उपस्थित होते
Comments
Post a Comment