मनसे कोल्हापूर शहर मुख्य संघटक पदी संजय पाटील यांची निवड

 

मनसे कोल्हापूर शहर मुख्य संघटक पदी संजय पाटील यांची निवड



कोल्हापूर  23 सिटी न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय किसान काँग्रेसचे माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री संजय पाटील यांनी आपल्या परिवर्तन संघटनेसह त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यरत असणाऱ्या तीन कामगार संघटना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला



   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचाराला पुढे नेण्यासाठी तसेच सत्तेसाठी कधीच कोणत्याही पक्षाशी तडजोड न न करण्याच्या त्यांच्या भूमिकेला पाठिंबा म्हणून तसेच महाराष्ट्रामध्ये नव निर्माण करण्यासाठी आपण पक्ष प्रवेश करत असल्याचे संजय पाटील म्हणाले भविष्यामध्ये उत्तर विधानसभेचा आमदार हा महाराष्ट्र निर्माण सेनेचा असेल  त्यासाठी तळागाळात वार्ड वस्त्यांवर पोचून पक्ष वाढवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भविष्यामध्ये पक्षाने आदेश दिल्यास आपण उत्तर विधानसभा निवडणूक लढवू असेही संजय पाटील यावेळी म्हणाले. शहराध्यक्ष यांच्या सोबतीने दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची बळकट बांधणी केली जाणार आहे तसेच वार्डनिहाय पदाधिकारी निवडी त्याचप्रमाणे पक्षांतर्गत असणाऱ्या सेलची पुनर्बांधणी लवकरच केली जाणार आहे .त्यांच्या निवडीसाठी संपर्क अध्यक्ष श्री जयराज दादा लांडगे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.त्यांची नियुक्ती शहराध्यक्ष तसेच माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी केली .या निवडीसाठी प्रसाद पाटील, विजय करजगार, निलेश धूम्मा, गणेश मोरे, रत्नदीप चोपडे यांचे सहकार्य लाभले



संजय पाटील यांना संपूर्ण जिल्हा आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलक या नावाने ओळखतो. त्यांनी आजपर्यंत सर्वसामान्य कष्टकरी ,वंचित ,शेतकरी, कामगार ,रेशन ग्राहक यांच्या हितासाठी शेकडो आंदोलने केलेली आहेत. आंदोलनातून त्यांनी हजारो लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे . भ्रष्टाचार काळाबाजार मोडून काढताना आज पर्यंत त्यांनी अनेक मोठे घोटाळे उघड केले त्यातून आजपर्यंत 13  अधिकाऱ्यांचे निलंबन झालेले आहे. 2010 मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त वाढावा कोट्यावधी रुपयांच्या स्वरूपात मिळवून दिलेला आहे.

त्यांच्या  नियुक्तीमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व ऊर्जा निर्माण झालेले आहे






Comments