‘नवरंगी नवरात्र उत्सव’ दांडिया स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न: पाच हजार स्पर्धकांचा सहभाग



‘नवरंगी नवरात्र उत्सव’ दांडिया स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न: पाच हजार स्पर्धकांचा सहभाग




 कोल्हापूर, ता. २३ सिटी न्यूज नेटवर्क 

   राजेश क्षीरसागर फौंडेशन, कोल्हापूर आणि शिवसेना-युवासेना जिल्हा व शहरतर्फे आज ‘नवरंगी नवरात्र उत्सव’ दांडिया स्पर्धा रामकृष्ण लॉन, मार्केट यार्ड येथे झाली. पाच हजार स्पर्धकांनी दांडिया स्पर्धेत धमाल केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते दांडिया स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. रात्री उशीरापर्यंत ही स्पर्धा रंगली. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे दिली. यामध्ये बेस्ट ग्रुप दांडियाकरीता ११ हजार रोख,  वैयक्तिकमध्ये पुरुषांसाठी सात हजार, महिलांसाठी सात हजार, लहान मुलांकरीता पाच हजार, लहान मुलींकरीता पाच हजार तसेच आकर्षक वेशभुषेकरीता रोख रक्कमेची बक्षीसे दिली. 




यावेळी लोकसभा कोल्हापूर व हातकणंगले युवासेना अध्यक्ष श्री ऋतुराज क्षीरसागर, सौ दिशा क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांच्यासह शिवसेना महिला आघाडी  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते




Comments