उत्साह अन् कलेचा नेत्रदीपक सोहळा, शहीद महाविद्यालयात दांडिया स्पर्धा उत्साहात
कोल्हापूर (टिटवे) २२ सिटी न्यूज नेटवर्क
टिपऱ्याचा मधुर आवाजाने उत्साहाला आलेली भरती
... प्रचंड जल्लोष... तरुणीनी दिलेली मनसोक्त दाद... कार्यक्रमस्थळी युवतींनी तालावर धरलेला फेर, दांडियाच्या तालावर थिरकणारे प्रेक्षक... प्रचंड उत्साहाचे वातावरण... त्यात जागतिक शिक्षणतज्ञ डॉ.जगन्नाथ पाटील यांनी विद्यार्थिनींशी साधलेला संवाद... उत्कृष्ट सजविलेला रंगमंच आणि आकर्षक रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळून जाणारा आसमंत... अत्याधुनिक ध्वनियंत्रणेवर मदहोश करणारे संगीत आणि हवीहवीशी वाटणारी मंद वाऱ्यासह अंगावर झेपावणारी थंडी.... अशा भारावलेल्या वातावरणात महाविद्यालयीन धमाल दांडिया स्पर्धेच्या रूपातील ऊर्जा, उत्साह अन् कलेचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवेच्या प्रांगणात पार पडला.या कार्यक्रमाचे उद्दघाटन शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई सिताराम पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मा.प्रगती पाटील प्रा. दामिनी ढेंगे ,प्रा. दीपाली मोरे, प्रा. वैभव कुंभार उपस्थित होते.
या दांडिया महोत्सवामध्ये पाचशेहून अधिक विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या होत्या. बीएससी आय.टी.तृतीय वर्षातील विद्यार्थीनींनी प्रथम पारितोषिक मिळवले. बीए मास मीडियाच्या विद्यार्थीनींनी दृत्तिय पारितोषिक मिळवले. बीएससी मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थीनींनी तृतीय पारितोषिक मिळविले.
यावेळी पोस्टर प्रेझेंटेशन व कुकिंग स्पर्धेचे
पारितोषिक वितरित करण्यात आले.या पोस्टर प्रेझेंटेशन
मध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक कु. तेजस्विनी धुंदरे, दृत्तीय क्रमांक कु.ज्योती थोरवत, तृतीय क्रमांक कु.ज्योती पाटील.कुकिंग स्पर्धेचेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक कु. दीक्षा मोहिते,दृत्तीय क्रमांक कु.आर्या पाटील तसेच कु. वैभवी पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या दांडिया महोत्सवाचे समन्वयन प्रा. सागर शेटगे व प्रा. अश्विनी कांबळे यांनी जबाबदारी पाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य. प्रशांत पालकर यांनी केले. सूत्रसंचालन कु. सनिका पाटील यांनी केले तर आभार प्रा. अविनाश पालकर यांनी मानले.
Comments
Post a Comment