दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 शनिवार, ११ नोव्हेंबर २०२३






. अश्विन कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी. शरद ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज वर्ज्य दिवस आहे" 


नक्षत्र: चित्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कन्या/तुळ. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र अनुकूल होत आहे. दीर्घकालीन नफा होईल. मात्र शत्रूत्रास जाणवेल. माघार घ्यावी लागेल.   

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक स्थिती सुधारेल मात्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहन जपून चालवा.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. उच्च शिक्षणात यश मिळेल. दूरचे प्रवास संभवतात.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पूर्वार्ध चांगला आहे. कामे पूर्ण करा. नात्यात वाद टाळा. नोकरीच्या जागी संयम बाळगा.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तरार्ध अनुकूल आहे. स्पर्धेत बाजी माराल. कोर्ट कामात यश लाभेल. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आत्मविश्वासवाढेल. मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वाहनांच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे.

   


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. दबदबा वाढेल. अधिकाराचा योग्य वापर करा.  

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पूर्वार्धात कामे पूर्ण करा. अग्निपासून सावध रहा. उत्तरार्ध विश्रांतीचा आहे. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मागील प्रमाणे कामे चालू ठेवा. नवीन करार नकोत. संमिश्र कालावधी आहे. 

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. मात्र व्यवसायात काही अप्रिय प्रसंग घडू शकतात.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पूर्वार्ध फारसा अनुकूल नाही. सुरुवात संथ होणार आहे. उत्तरार्धात कामे मार्गी लागतील. प्रवास टाळणे हिताचे आहे.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवसाचा पूर्वार्ध शुभ आहे. आर्थिक आवक वाढेल. उत्तरार्ध संथपणे व्यतीत होईल. अति धाडस नको.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments