दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

रविवार, १२ नोव्हेंबर २०२३






. अश्विन कृष्ण चतुर्दशी. शरद ऋतू. दक्षिणायन. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज आनंदी दिवस आहे" *नरक चतुर्दशी, (सूर्योदय ६.४५) लक्ष्मीकुबेर पूजन*


चंद्रनक्षत्र - स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक जोखीम घेऊ नका. अधार्मिक कृत्ये हातून घडणार नाहीत याची काळजी घ्या. सरकारी नियमांचे पालन करा. 

      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली होणार आहे. मन आनंदी राहील. धार्मिक कार्यातही खर्च कराल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. अनुकूलता लाभलेली आहे. संतती कडून खुश खबर मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) घरगुती कामात व्याकगर व्हाल. सणाचा आनंद घ्याल. आप्तेष्ट भेटतील.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांना उत्तम यश मिळेल. प्रवासात काळजी घ्या.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कौटुंबिक सौख्यचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात खर्च कराल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मेजवानी मिळणार आहे. आनंदी राहाल. पत्नीशी मतभेद टाळा.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रतिकूल ग्रहमान आहे. विनाकारण मनस्ताप करून घेऊ नका. खर्च वाढणार आहे.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. सणाचा आनंद घ्याल.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अचानक एखादे काम निघू शकते. मनाची तयारी ठेवा. आर्थिक नियोजन करा.  

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवीन माहिती आणि ज्ञान मिळण्यासाठी चांगला दिवस आहे. अभ्यासू वृत्तीचा फायदा होईल. छोटे प्रवास घडतील.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रतिकूल दिवस आहे. कौटुंबिक मतभेद संभवतात. संयमाने परिस्थिती हाताळा.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)


 १२ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे जीवन सुखासीन असते अन भिन्न लिंगी व्यक्तींकडे तुमचा ओढ असतो. इतरांचे किरकोळ दोष सुद्धा तुम्ही सहज काढू शकतात. तुम्हाला अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात सतत पुढे जाण्याचा विचार करत असतात. तुमच्याकडे ज्ञान आहे मात्र त्याचा अहंकार टाळला पाहिजे. तुमचा कर्मकांडावर विश्वास नसतो. तुम्ही नेहमी योग्य व्यक्तीला मदत करतात. तुम्ही न्याय प्रेमी असून तुम्हाला शुद्ध प्रेमाची आवड आहे. इतरांच्या प्रगतीसाठी तुम्ही कष्ट करतात आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतात. तुम्ही उत्साही आणि क्रियाशील आहात परंतु शीघ्रकोपी आहात. इतरांवर तुम्ही वर्चस्व गाजवतात. एखाद्या मोठ्या कारखान्याचे तुम्ही उत्कृष्टपणे संचालन करू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमची जबाबदारी तुम्ही चोख पार पाडतात. तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वतःचे डोके शांत ठेवल्यास कोणतीही गोष्ट मिळवणे तुम्हाला अशक्य नाही. तुम्ही दयावान आणि नीतिमान आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यामध्ये पुरेपूर आत्मविश्वास आहे. तुम्ही व्यवस्थित आणि दिमाखदार आहात. तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा असतो. तुम्हाला अनेक खेळांची आवड असते. तुम्हाला उत्तम विनोद बुद्धी लाभलेली आहे. तुम्ही हट्टीपणा आणि अहंकार टाळला पाहिजे. भविष्यात घडणाऱ्या घटनांची तुम्हाला आधीच जाणीव होते. तुम्ही अतिसंवेदनशील आहात त्यामुळे तुमचे वागणे एकांती आणि गूढ असते. 


व्यवसाय:- न्यायाधीश, सचिव, सामाजिक कार्यकर्ता, धार्मिक गुरु, शिक्षक, कारखानदार, सावकार, जाहिरात वितरक, अभिनेता, मॅनेजिंग डायरेक्टर.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.


शुभ रंग:- अंजिरी, पिवळा आणि जांभळा.


शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट आणि लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments