दैनिक राशिभविष्य
सोमवार, १३ नोव्हेंबर २०२३.
.. अश्विन अमावस्या. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ/वृश्चिक.
"आज वर्ज्य दिवस" *दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या*
मेष:- भागीदारी व्यवसायात अडचणी संभवतात. शत्रू त्रास जाणवेल. पत्नीशी मतभेद टाळा.
वृषभ:- प्रतिकूल दिवस आहे. खर्चात वाढ संभवते. सकाळच्या सत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत.
मिथुन:- विनाकारण दोषारोप होऊ शकतात. काळजी घ्या. प्रवासात त्रास संभवतो.
कर्क:- नोकरी आणि घर यात ओढाताण होऊ शकते. अचानक एखादे काम समोर येईल.
सिंह:- आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. मात्र मोठे व्यवहार करताना जपून करा. आर्थिक नियोजन करा.
कन्या:- विनाकारण कौतुकमिक काळ होऊ शकतात. नमते घ्या. संयम ठेवा. कलाकारांना चांगला दिवस आहे.
तुळ:- क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. जवळची व्यक्ती अचानक शत्रू होऊ शकते. गैरसमज टाळा.
वृश्चिक:- प्रतिकूल दिवस आहे. कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद नकोत.
धनु:- अचानक लाभाचा दिवस आहे. चांगले अनुभव येतील. अडचणी दूर होतील.
मकर:- कामाचा ताण वाढेल. प्रशासकीय कामासाठी वेळ द्यावा लागेल. गृहकलह टाळा.
कुंभ:- नवम स्थानी रवी चंद्र युती आहे. काही सुखद अनुभव येतील. आप्त भेटतील. जेष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल.
मीन:- प्रतिकूल दिवस आहे. दगदग वाढेल. आगीपासून सावध रहा. वाहन जपून चालवा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
१३ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जन्मताच कलाकार आहात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही मित्र मंडळीत लोकप्रिय असतात. तुमची स्वतंत्रपणे काम करण्याची वृत्ती आहे. तुमच्यात संघटन क्षमता आहे. तुम्हाला परंपरा आणि सामाजिक बंधने आवडत नाहीत. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वभाव खर्चिक आहे. उच्च प्रतीचे दागिने, वाहने, सुगंधी द्रव्ये आणि सुंदर वस्तू यांसह तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. स्वभाव पद्धतशीर आणि अभ्यासू आहे. तुम्ही उत्तम सल्लागार आहात. मित्रांना मदत करतात. डोके शांत ठेवून आणि अहंकार बाजूला ठेऊन काम केल्यास तुम्ही उत्तम प्रगती साधू शकतात.
व्यवसाय:- सराफी व्यवसाय,संगीतकार, हॉटेल, केमिस्ट, सुगंधी द्रव्ये विक्री, इतिहास, खनिज द्रव्ये विक्री, रत्ने विक्री, तत्वज्ञान.
शुभ दिवस:-सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
शुभ रत्न:- हिरा, पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments
Post a Comment