दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

गुरूवार, १६  नोव्हेंबर २०२३. 






कार्तिक शुक्ल तृतीया/चतुर्थी. शरद ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज उत्तम दिवस" *विनायकी चतुर्थी*


चंद्र नक्षत्र - मूळ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लक्ष्मी प्रसन्न होईल. मात्र प्रशासकीय कामातून त्रास संभवतो. वाहन सावकाश चालवा.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. शत्रू डोके वर काढतील. सामाजिक वादविवाद टाळा.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भागीदारी व्यवसायात यश मिळेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. शत्रूंचा नाश होईल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम आर्थिक लाभ होतील. दबदबा वाढेल. अति धाडस नको. 

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अचानक लाभ होतील. नातेवाईकांची भेट होईल. मात्र घरगुती वादविवाद टाळा. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवसाची सुरुवात संथ होईल. मात्र नंतर कामाचा वेग वाढेल. भावंड मदत करतील.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक बाबतीत विशेष लाभ होतील. कौटुंबीक सुखात कमतरता येऊ देऊ नका. शासकीय कामे वेळेत पूर्ण करा.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  मान सन्मान मिळतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. शब्द देताना जपून द्या. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मेजवानीचे योग आहेत. आनंदी राहाल. स्वतःच्या सुखासाठी खर्च मात्र वाढणार आहे.  

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चात वाढ होईल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. मन प्रसन्न राहील. कामे मार्गी लागतील. प्रशासकीय लाभ मिळतील.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. मात्र काही चांगले अनुभव येतील. उत्साह वाढेल. आवक वाढेल.


 १६ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


       तुमच्यावर नेपचून आणि मंगल ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही मनाने उदार आणि मिश्किल स्वभावाचे आहात. तुम्ही भावनाप्रधान आणि हळवे असतात. लवकर अस्वस्थ होतात. प्रकृतीची सतत काही ना काही कुरबुर सुरू असते. तुम्हाला नशीबवान अपत्ये होतात. तुमचे वागणे गूढ असते. धर्म आणि रूढी या बाबतच्या तुमच्या कल्पना चमत्कारिक असतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही त्याचा मुकाबला करू शकतात. तुम्ही स्वतंत्र वृत्तीचे आहात. तुम्ही धाडसी, आक्रमक आणि लढाऊ आहात. दूर प्रवासाची आवड असते. परदेशाशी संबंध येतो. मनातून अस्वस्थ असतात. विचार तर्कशुद्ध असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही स्वयंपूर्ण असतात. फक्त चांगल्या गोष्टींची तुम्ही निवड करतात. सर्वसाधारण माणसांमध्ये तुम्ही रमत नाहीत. स्वभाव भावनाप्रधान असतो. मित्रणाचे बाजू नेहमीच समर्थपणे घेतात.तुम्ही खंबीर आणि ठाम विचारांचे आहात. उत्साह आणि चिकाटी असते. तुम्ही नम्र आणि सभ्य असतात. तुम्हाला रहस्यकथा आणि गंभीर साहित्य आवडते. भूतकाळातील अनेक घटना तुम्हाला स्पष्ट आठवतात.   


व्यवसाय:-  आयात - निर्यात, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय, संशोधन.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.


शुभ रंग:- पांढरा, हिरवा, पिवळा. 


शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती,

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments