दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

गुरूवार, २ नोव्हेंबर २०२३. 





अश्विन कृष्ण पंचमी. शरद ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज उत्तम दिवस" 


चंद्र नक्षत्र - आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक बाजू बळकट होईल. नात्यातून लाभ होतील.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कुटुंबक सौख्याच्या दृष्टीने उत्तम कालावधी आहे. स्थावर संपत्ती वाढेल. मोठे करार होतील.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढवणारा कालावधी आहे. मन प्रसन्न राहील. नवीन खरेदी होईल. मौल्यवान घटना घडतील.  


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. खर्च वाढणार आहे. मात्र तरीही आनंदी राहाल. मोलाचे क्षण अनुभवाल. 

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अतिशय आनंदाचा दिवस आहे. प्रगती होईल. शुभ ग्रहामानाचा आनंद घ्याल. यश मिळेल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नोकरीत मनासारख्या घटना घडतील. आर्थिक आवक वाढेल. व्यवसायात यश लाभेल. स्वप्ने साकार होतील.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) साक्षात लक्ष्मी प्रसन्न करणारा कालावधी आहे. हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. आनंदी आनंद अनुभवाल.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होईल. प्रवास घडतील. संयम ठेवावा लागेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरगुती कामातून आनंद मिळेल. कौटुंबीक सहल घडेल. आनंद मिळेल. तीर्थाटन होईल.

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक यश मिळेल. उत्सवाचा आनंद घ्याल. प्रसन्न वाटेल. कनिष्ठ कर्मचारी सहकार्य करतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पेच सुटतील. गूढ उलगडतील. नवीन माहिती मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पशु लाभ होतील. समाजात नाव उंच होईल. मान सन्मान मिळतील. समाज कार्य कराल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments