दैनिक राशिभविष्य
शनिवार, २५ नोव्हेंबर २०२३.
कार्तिक शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी. शरद ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज चांगला दिवस आहे" *आवळीच्या झाडाखाली विषुनुपूजन, घबाड दुपारी २.५६ नंतर*
नक्षत्र: अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज तुमच्याच राशीत चंद्र आणि गुरू युती आहे. विशेष लाभदायक दिवस आहे. अध्यामिक लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सप्तमतील मंगळाचा शनिशी केंद्र योग आहे. शत्रू शरजोर होतील. कोर्ट कामात अपयश संभवते.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. गूढ उलगडतील. सत्संग घडेल. आर्थिक तरतूद होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाच्या ठिकाणी मन रमेल. वरिष्ठ खुश राहतील. मनासारखी कामे होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लक्ष्मीची कृपा बरसेल. उच्च शिक्षणात यश मिळेल. प्रवास घडतील. गृहकलह टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. मोठे निर्णय आज नकोत. आध्यत्मिक लाभ होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कष्टाचे चीज होईल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. कठोर बोलणे टाळा. जामीन राहू नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सकारात्मक धोरण राबवा. कोणासही कमी लेखू नका. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. संतती बाबत शुभ समाचार समजेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गृहसौख्य अनुभवाल. शेतीच्या कामातून यश मिळेल. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक आवक चांगली राहणार आहे. दीर्घकालीन नफ्याचे करार होतील. मात्र काही व्यवसायीक अडचणी उदभवू शकतात.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कौटुंबीक सौख्य लाभेल. धनवृद्धी होईल. स्थावर संपत्तीत भर पडेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
आज रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते.
व्यवसाय:- आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment