डिजिटल मिडिया संघटनेचे जानेवारीमध्ये दुसरे राज्यव्यापी अधिवेशन कोल्हापूरात-राज्य अध्यक्ष राजा माने

 डिजिटल मिडिया संघटनेचे जानेवारीमध्ये दुसरे राज्यव्यापी अधिवेशन कोल्हापूरात-राज्य अध्यक्ष राजा माने




कोल्हापूर  दि 27 सिटी न्यूज नेटवर्क 

डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेचे दुसरे राज्यव्यापी अधिवेशन कोल्हापूर येथे घेण्याची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी अशी घोषणा केली आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संघटनेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या पदाधिकारी यांच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.सदरचे राज्यव्यापी अधिवेशन जानेवारी महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात आल्याचे राजा माने यांनी सांगितले. सदर मिटिंग मध्ये या अधिवेशनाला विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून सदर अधिवेशनाची रूपरेषा लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले.सदर बैठकीवेळी राज्य कार्यकारिणी चे प्रमोद मोरे,रितेश पाटील,सातारा जिल्ह्यध्यक्ष विकास भोसले,सोलापूर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत,कोल्हापूर जिल्ह्यध्यक्ष सुहास पाटील,कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रशांत चुयेकर,कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, तसेच डिजिटल मिडिया संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Comments