युवा शक्तीचा निर्धार "राजेश क्षीरसागर पुन्हा आमदार"; शक्तिप्रदर्शनार्थ टू व्हीलर रॅली

 युवा शक्तीचा निर्धार "राजेश क्षीरसागर पुन्हा आमदार"; शक्तिप्रदर्शनार्थ टू व्हीलर रॅली



*देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी युवकांचे योगदान महत्वाचे : श्री.राजेश क्षीरसागर;*


कोल्हापूर दि. २४ सिटी न्यूज नेटवर्क 

देशाला जागतिक महासत्ता बनविण्याचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचे धोरण असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा जीडीपी वाढविण्यासाठी निती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख तिसरी व्यक्ती म्हणून मला स्थान देण्यात आले असून, उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मित्र संस्थेच्या माध्यमातून औद्योगिक, आय.टी.क्षेत्राची प्रगती करून युवा रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. यातून राज्याची व पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासर्वांमध्ये युवा वर्गाचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून, देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी युवकांनी बहुमोल्य योगदान द्यावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिनी कोल्हापूर जिल्हा व शहरातील युवा शक्तीने भगव्या टू व्हीलर रॅलीद्वारे शहरात शक्तिप्रदर्शन केले. या टू व्हीलर रॅलीतून "राजेश क्षीरसागरच पुन्हा आमदार" असा निर्धार युवा शक्तीने केला. या टू व्हीलर रॅलीने शहरातील वातावरण शिवसेनामय केले. हजारोंच्या संख्येने असलेल्या दुचाकी, हातात श्री.क्षीरसागर यांचे कट आउट व भगव्या झेंड्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले.



टू व्हीलर रॅलीची सुरवात युवा नेते श्री.पुष्कराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, हातकणंगले युवासेना अध्यक्ष श्री.ऋतुराज क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सोन्या मारुती चौक येथून करण्यात आली. ही टू व्हीलर रॅली पापाची तिकटी मार्गे, माळकर तिकटी, मटण मार्केट, बिंदू चौक, आझाद चौक, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, नंगीवली तालीम, लाड चौक, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, साकोली कॉर्नर, ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, शुक्रवार गेट, मा.आ.गायकवाड पुतळा, तोरस्कर चौक जुना बुधवार पेठ मार्गे शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे समाप्त करण्यात आली. यावेळी उपस्थित युवा वर्गाकडून पुष्पहार घालून श्री.क्षीरसागर यांचा वाढदिवसानिमित्त गौरव करण्यात आला.

Comments