धीरज रुकडे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती च्या मुख्य कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदी निवड

 धीरज रुकडे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती च्या मुख्य कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदी निवड



कोल्हापूर दि 22 सिटी न्यूज नेटवर्क 


संपूर्ण भारतात भ्रष्टाचार वर काम करणाऱ्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या महाराष्ट्र मुख्य कार्यकारी अध्यक्ष पदी कोल्हापूरच्या धीरज रुकडे यांची निवड झाली आहे.धीरज रुकडे हे माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेली 20 वर्षे ते विविध सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत.

तसेच भन्नाट न्यूज चे संपादक म्हणून ते काम पाहत आहेत.वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अनुभवातून कोरोना काळात कोल्हापूर पोलीस दल,सी पी आर स्टाफ साठी त्यांनी प्रशासनाला सेवा दिली आहे.त्यांचा कायदेशीर बाबींतील अभ्यास उत्कृष्ठ संघटन कौशल्य आणि जनसंपर्क पाहता राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांनी त्यांची निवड करून निवडीचे पत्र त्यांना दिले आहे.त्याअनुषंगाने रुकडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचे पुनर्विस्तार करून संघटना मजबूत करण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.सदरची संघटना ही दिल्ली मध्ये रजिस्टर असलेली देशातील आघाडीची संघटना आहे की जी भ्रष्टाचाराचे काम करत असते. त्यामुळे अशा संघटनेवर निवड ही महत्त्वाची मानली जात आहे.नजीकच्या काळात सुशिक्षित तरुण तरुणींचे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मोठे नेटवर्क उभा करून मोठे काम उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments