पंधरा वर्षाखालील मुला-मुलींचा जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा : जांभळी चा अभय भोसले व जयसिंगपूरची दिशा पाटील

 पंधरा वर्षाखालील मुला-मुलींचा जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा :जांभळी चा अभय भोसले व जयसिंगपूरची दिशा पाटील अजिंक्य..






.शंतनू पाटील व दिव्या पाटील ला उपविजेतेपद, राज्य निवड स्पर्धेसाठी अकरा जणांची निवड


इचलकरंजी २० सिटी न्यूज नेटवर्क 

लायन्स क्लब ब्लड बँक दाते मळा इचलकरंजी येथे लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या सहकार्याने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या पंधरा वर्षाखालील मुला-मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात संपन्न झाल्या.स्विस् लीग पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम सहाव्या फेरीनंतर चौथा मानांकित अभय भोसले (जांभळी), पाचवा मानांकित शंतनु पाटील (कोल्हापूर), व सहावा मानांकित अथर्व तावरे (इचलकरंजी) या तिघांचे समान पाच गुण झाले होते.सरस बकोल्झ टायब्रेक गुणानुसार जांभळीच्या अभय भोसले ला अजिंक्यपद मिळाले तर कोल्हापूरच्या शंतनू पाटील ला उपविजेतेपदावर व इचलकरंजीच्या अथर्व तावरेला तृतीय क्रमांक वर समाधान मानावे लागले. अग्रमानांकित इचलकरंजीच्या विवान सोनीने साडेचार गुणासह चौथे स्थान मिळविले.याव्यतिरिक्त अरिन कुलकर्णी (कोल्हापूर), हित बलदवा (जयसिंगपूर),आराध्य ठाकूरदेसाई (इचलकरंजी) व अवनिश जितकर (कोल्हापूर) - यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली. मुलींच्या गटातील स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण पाच फेऱ्यात घेण्यात आली.अंतिम पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित दिव्या पाटील व दिशा पाटील या जयसिंगपूरच्या जुळ्या भगिनींचे समान चार गुण झाले होते.टायब्रेक गुणाानुसार दिशा पाटील अजिंक्य ठरली तर दिव्या पाटीलला उपविजेतेपद मिळाले.कोल्हापूरच्या महिमा शिर्के व अरिना मोदी या दोघीनी साडेतीन गुणासह अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळविले.सिद्धी बुबने(नांदणी), सांची चौधरी (इचलकरंजी) व थिया शहा (इचलकरंजी) या तिघींचा तीन गुणांसह अनुक्रमे पाचवा सहावा व सातवा क्रमांक आला.याव्यतिरिक्त वयोगटात उत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून संस्कृती सुतार(नांदणी),सिद्धी कर्वे (जयसिंगपूर), क्रिती भांगरिया (इचलकरंजी) व मिहीका सारडा (इचलकरंजी) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.



मुले व मुलींच्या दोन्ही गटात पहिल्या तीन क्रमांकांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरवण्यात आले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे उपाध्यक्ष अमित पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले,रोहित पोळ,अमित मोदी, करण परीट,आरती मोदी व रेश्मा नलवडे उपस्थित होते. या स्पर्धेतून खालील चार मुलांची सात मुलींची अशा एकूण अकरा जणांची निवड सांगली येथे दिनांक २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या पंधरा वर्षाखालील राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात करण्यात आली आहे..

मुले :- 1) अभय भोसले (जांभळी) 2) शंतनू पाटील (कोल्हापूर) 3) अथर्व तावरे (इचलकरंजी) 4) विवान सोनी (इचलकरंजी)

मुली:- 1) दिशा पाटील (जयसिंगपूर) 2)दिव्या पाटील (जयसिंगपूर) 3) महिमा शिर्के (कोल्हापूर) 4) अरिना मोदी (कोल्हापूर) 5) सिद्धी बुबणे (नांदणी) 6) सांची चौधरी (इचलकरंजी) 7) थिया शहा (इचलकरंजी)

निवड झालेल्या प्रत्येक बुद्धिबळपटूला स्पर्धेसाठी प्रत्येकी एक टी शर्ट व स्पर्धा खेळल्यानंतर प्रत्येकी एक हजार रुपये जिल्हा संघटना देणार आहे.

Comments