दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

शनिवार, २ डिसेंम्बर २०२३. .






कार्तिक कृष्ण पंचमी/षष्ठी. शरद ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज चांगला दिवस आहे"    


नक्षत्र: पुष्य. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चतुर्थ स्थानात चंद्र आहे. शुभ योग आहेत. लाभ होतील. जुन्या वस्तू सापडतील. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक भरभराट होईल. येणी वसूल होतील. कर्ज मात्र वाढेल. व्यवसायात वाढ होईल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कौटुंबिक सहल घडेल. कलाकारांना यश लाभेल. प्रवासातून नवीन ओळखी होतील.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धाडसी निर्णय घ्याल. सर्वत्र कौतुक होईल. कठोर भूमिका घ्यावी लागेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्चात वाढ संभवते. मात्र योग्य कारणासाठी त्याचा वापर होईल. काळजी नसावी.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. संधीचा लाभ घ्या. स्वप्ने साकार होतील.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. अधिक लाभ मिळतील. वरिष्ठ खुश राहतील.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम ग्रहमान आहे. मंगळ आणि राविचा चंद्राशी शुभ योग आहे. उत्साह वाढेल. कामे मार्गी लागतील.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. मात्र बुध शनी लाभ योग नवीन आशा निर्माण करतील.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल रवी - मंगळ सर्व सुखे प्रदान करतील. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. राजकीय दबदबा वाढेल.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) षष्ठ स्थानी चंद्र आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. सरकारी कायदे पालन करा. यश मिळेल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नवनवीन कल्पनांना मूर्त रूप द्याल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नव्या प्रकल्पातून लाभ होतील.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


 आज  रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते.


व्यवसाय:-  आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.


शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments