आज अनुभवता येणार उल्कावर्षाव
कोल्हापूर 14 सिटी न्यूज नेटवर्क
येत्या १४ डिसेंबर रात्री (१५ डिसेंबर पहाट) मिथुन राशीतून छान उल्कावर्षाव होणार आहे. हा उल्कावर्षाव अत्यंत ठळक दिसत असल्याने ह्याचा आस्वाद घ्यायला फार मजा येते.
१४ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १२ वाजल्यापासून आकाशात कुठल्याही दिशेला (विशेषतः पूर्वेला) उल्कावर्षाव दिसेल. आकाश छान आणि प्रकाशापासून दूर असल्यास तासाला तब्बल १०० उल्का दिसतील.
त्याच दिवशी पाहिल्यास सर्वोच्च उल्का दिसतील. परंतु त्यानंतरच्या शनिवार - रविवार होणाऱ्या आपल्या ट्रेक लीडर्स ना विशेष माहिती देतो की त्यांना त्या दिवशी सुद्धा डोंगरातून फार सुंदर उल्का पाहायला मिळतील.
तिथी अमावस्येच्या जवळची असल्याने चंद्र प्रकाश अडथळा निर्माण करणार नाही, त्यामुळे हा उल्कावर्षाव पाहणं अत्यंत मनमोहक असेल.
हा उल्कावर्षाव सगळ्यांनी आवर्जून पाहावा अशी विनंती.
.jpeg)
Comments
Post a Comment