"डी मार्ट" मधील बुरशीजन्य बिस्किटातून लहान मुलींना विषबाधा : "मनसेची" डी मार्ट वर धडक मोहीम

 "डी मार्ट" मधील बुरशीजन्य बिस्किटातून लहान मुलींना  विषबाधा : "मनसेची" डी मार्ट वर धडक मोहीम


कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापुरातील "डी मार्ट" मधील बुरशी चढलेली कराची कंपनीची बिस्किटे खाऊन छोट्या मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याने "मनसे" कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट वरती धडक मोहीम राबवली.

       कराची नावाच्या कंपनीची बिस्किटे व काजू कतरी ला बुरशी चाललेली असताना डी मार्ट मधून त्याची विक्री केली जात होती. बुरशी चढलेली बिस्किटे व काजू कतली मनसे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी स्टोअर मॅनेजर अजिंक्य थोरात याला दाखवून मनसे स्टाईलने धडा शिकवला.

      अन्न औषध प्रशासन आयुक्त तुषार शिंगाडे वं निरीक्षक गणेश कदम यांना डी मार्ट मध्ये बोलावून घेऊन बुरशी चढलेली सर्व बिस्किटे , काजुकतली , मशरूम व अन्य बुरशीजन्य पदार्थ सील करावयास लावून त्याचा पंचनामा करून मनसे पदाधिकाऱ्यांच्या पंचनाम्यावर स्वाक्षरा घेण्यास भाग पाडले . तसेच अन्न औषध प्रशासना कडून बुरशीजन्य पदार्थ सील करण्यात आले. कार्यालयीन सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर डी मार्ट वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले .

. डी मार्ट च्या वजनामध्ये प्रचंड दोष असल्याने याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असताना देखील कोल्हापुरातील पत्रकारांनी ताराबाई पार्क येथील डी मार्ट मधून डाळ खरेदी करून त्यामध्ये होत असणारा वजनाच्या काटामारीच्या व्हिडीओ करताना डी मार्ट कर्मचाऱ्याकडून चांगलाच अनुभव घेतला असल्याने मंगळवार २ जानेवारीला वजन, मापे नियंत्रकाला घेराव घालणार असल्याची भावना शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी व्यक्त केली .

        नवीन वर्षात बॅन डी मार्ट अभियान राबवणार असून कोल्हापूरच्या जनतेने डी मार्ट मधून कोणतेही वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी विशद केले.

        या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले., जिल्हा सचिव प्रसाद पाटील , जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील , विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत , विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष अजिंक्य शिंदे , यतीन हुरणे , उत्तम वंदूरे , अमित साळुंखे , राहुल पाटील, संतोष चौगुले रणजीत वरेकर , नितेश गणेशाचार्य, अरविंद कांबळे इत्यादी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments