दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 शुक्रवार, २९ डिसेंम्बर २०२३





 मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया/तृतीया. हेमंत ऋतू, उत्तरायण, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


आज वैधरुती वर्ज्य दिवस. 


 चंद्रनक्षत्र - पुष्य.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) फारशी अनुकूलता नाही. माता - पित्यांशी वाद टाळा. अधार्मिक कृत्ये हातून घडणार नाहीत याची काळजी घ्या.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी विनाकारण खर्च वाढेल. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे. विनाकारण कोणाबद्दलही मनात अढी ठेवू नका.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) शत्रू शिरजोर होण्याची शक्यता आहे. सरकारी कामातून त्रास संभवतो. अनुकूल गुरू योग्य मार्ग दाखवेन.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आवडत्या छंदात मन रमेल. आरोग्याची काळजी ग्यावी लागेल. चोरीचे भय आहे. नोकरीत अनुशासन महत्वाचे आहे.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिकूल दिवस आहे. आज महत्वाची कामे नकोत. योग्य सल्ल्याशिवाय पॉल उचलू नये.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. संस्कार - दीक्षा घेण्यास चांगला कालावधी आहे. धार्मिक कार्यास हातभार लावाल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रसिद्धीची हवं धरू नये. त्यातून अनर्थ घडू शकतो. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या. नोकराकडून त्रास संभवतो.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. स्व- जनाचा विरोध सहन करावा लागू शकतो. डोळ्यांची काळजी घ्या.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अष्टम स्थानी चंद्र आहे. अति आत्मविश्वास अडचणीचा ठरू शकतो. प्रतिष्ठा पणास लागेल.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कौटुंबिक कलह टाळा. संततीशी मतभेद संभवतात. पत्नीचे सहकार्य लाभेल.  


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुने मित्र भेटतील. औषधांशी संबंध येईल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दशम स्थानी रवी आहे. चंद्राशी अशुभ योग आहे. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. सरकारी कामात दिरंगाई नको.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


२९ डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुम्ही संतापी असले तरी गुरू ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकतात. "प्रेमासाठी सर्वकाही" असा तुमचा स्वभाव आहे. तुम्ही कुटूंबवत्सल असून घराबद्दल तुम्हाला अत्यांतीक ओढ असते.  तुमचा स्वभाव अत्यंत महत्त्वाकांक्षी असून तुम्हाला विविध गोष्टींमध्ये रस असतो तुमच्याकडे उत्तम वक्तृत्व आणि शब्दभांडार आहे. तुम्ही इतरांवर सहज छाप पाडू शकतात. तुम्ही स्वतंत्र विचारांचे आहात. कला क्षेत्राबद्दल तुम्हाला आकर्षण असून तुम्ही त्याचा आस्वाद घेतात. तुम्हाला सतत कामात मग्न राहणे आवडते. तुम्हाला सहसा एकाच ठिकाणी मन एकाग्र करता येत नाही. मानवी स्वभाव तुम्ही उत्तम ओळखू शकतात. तुमचा स्वभाव निस्वार्थी आणि सभ्य आहे. तुमच्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती असून कोणताही विषय सखोलपणे समजून घेणे तुम्हाला आवडते. मात्र जीवनामध्ये शिस्त असावी असा  तुमचा दंडक आहे. तुम्हाला गूढ जीवनाचे आकर्षण असते. तुम्ही सर्वांमध्ये चटकन मिसळतात. मान्यता प्रतिष्ठा या गोष्टींना तुम्ही अधिक महत्त्व देतात. हुशार आणि बुद्धिमान लोकांशी तुमचे उत्तम जमते. एकंदरीत तुमचे जीवन समाधानी आणि सुखी असते.


आरोग्य:- नैराश्य, उदासीनता, झोपेची तक्रार, संधिवात, पाय दुखणे, पोटाचे विकार संबंधित रोगपासून सावध रहा.


शुभ दिवस:- सोमवार, रविवार, गुरुवार.


शुभ रंग बदामी.


शुभ अंक:- 2, 6, 9.


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments