शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती साठी स्वतंत्र भारत पक्षा शिवाय पर्याय नाही... अनिल घनवट
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती व शेतमालाचे भाव पाडण्याच्या सरकारच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाले आहेत, कोणत्याही पक्षाची शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही, शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटविण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय आहे असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यक्त केले, अध्यक्षस्थानी बनाबाई पाटील होत्या
स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा कोल्हापूर जिल्हा दौरा कळे ता. पन्हाळा आयोजित करण्यात आला होता, कळेत हरीनारायन सांस्कृतिक हॉल येथील सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या, आंदोलनाची तयारी व पक्ष बांधणीवर चर्चा करण्यात आली. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे उपस्थित होते.
महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे म्हणाल्या देशात व राज्यात राजकारणाची पातळी ढासळली असून कोणत्याही पक्षाला विचारधारा राहिली नाही सत्तेत राहण्यासाठी पक्ष फोडणे व गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला असून सर्व नागरिक परेशान आहेत एकही प्रस्थापित कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित व देशात कायद्याचे राज्य पुनर्स्थापित करू शकत नाही. शरद जोशींनी स्थापन केलेला स्वतंत्र भारत पक्ष बळकट करणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अशोकराव जाधव यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, सुरळीत वीजपुरवठा व कर्जमुक्ती साठी जानेवारी महिन्यात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा निर्णय बैठकीत करण्यात आला.
या बैठकीत स्वतंत्र भारत पक्षाच्या पश्चिम कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावर श्री बबन हिंदुराव खाटांगळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. सूत्रसंचालन डाॅ.बबन कूभांर यांनी केले. बैठकीस शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, बाळासाहेब परळीकर, पांडुरंग टिके, प्रकाश पाटील, श्रीपती पाटील, बळवंत तळसकर, निवास चौगुले, सरदार आंग्रे, प्रकाश पाटील, शोभा पाटील, लक्ष्मी कांबळे, अमोल पवार, शंकर कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment