खासदार चषक अखिल भारतीय खुल्या भव्य बुद्धिबळ स्पर्धा : कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटेस अजिंक्यपद

 खासदार चषक अखिल भारतीय खुल्या भव्य बुद्धिबळ स्पर्धा : कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटेस अजिंक्यपद, मिरजेचा मुद्दसर पटेल उपविजेता तर पुण्याचा नमित चव्हाण तृतीय स्थानी




कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क 

 चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने आणि अनयाज् चेस क्लब ने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील भव्य अश्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात आयोजित केलेल्या अखिल भारतीय खुल्या भव्य खासदार चषक जलद बुद्धिबळ मोठ्या दिमाखात आज संपन्न झाल्या.खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून खासदार महोत्सव क्रीडा कुंभमेळाव्या अंतर्गत या बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या.

स्विस् लीग पद्धतीने झालेल्या स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे ने नऊ पैकी साडेआठ गुण मिळवून अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकाविले.त्याला रोख पंधरा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. सातवा मानांकित मिरजेच्या मुद्दसर पटेल ने आठ गुणांसह उपविजेतेपदाला गवसणी घातली त्याला रोख बारा हजार रुपये व चषक देऊन गौरविले.आठवा मानांकित पुण्याच्या नमित चव्हाण ने आठ गुणांसह तृतीय स्थानवर मुसंडी मारली त्याला रोख आठ हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.खुल्या गटात रोख 25 बक्षिसे व विविध वयोगटात 75 उत्तेजनार्थ बक्षीसे अश्या एकूण 100 बक्षीसांचे वितरण केले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ अमित पालोजी, एडवोकेट मंदार पाटील,अध्यक्ष युवा सेना कोल्हापूर शहर,सुधीर राणे, रोहित पवार, शिवप्रसाद घोडके व सागर डबलं यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर मुख्य पंच व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मनीष मारुलकर उमेश पाटील,उत्कर्ष लोमटे,आरती मोदी व दीपक वायचळ उपस्थित होते.सूर्याजी भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.धनंजय महाडिक युवाशक्ती चे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक व वैष्णवी महाडिक या उभयतांनी स्पर्धा स्थळी भेट देऊन खेळाडूंचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेसाठी करण परीट, दीपक वायचळ, आरती मोदी, सूर्याजी भोसले, जयश्री पाटील, सचिन भाट,किरण शिंदे,अभिजीत चव्हाण, विजय सलगर, शितल भाट, नयन पाटील या सर्वांनी पंच व संयोजक म्हणून अथक परिश्रम घेतले.

सर्व बक्षीस विजेत्यांची यादी

मुख्य बक्षिसे

 1) सम्मेद शेटे कोल्हापूर 2) मुद्दसर पटेल मिरज 3) नमित चव्हाण पुणे 4) ओंकार कडव सातारा 5) अनिकेत बापट सातारा 6) ध्रुव पाटील बार्शी 7) आदित्य सावळकर कोल्हापूर 8) ऋचा पुजारी कोल्हापूर 9) अनिश गांधी कोल्हापूर 10) सौरभ छत्रे पुणे 11) शर्विल पाटील कोल्हापूर 12) सौरिश कशेळकर रत्नागिरी 13) सारंग पाटील कोल्हापूर 14) अभिषेक गणिगर बेळगाव 15) श्रीधर तावडे कोल्हापूर 16) सोहम खासबारदार कोल्हापूर 17) संदीप माने सांगली 18) संतोष कांबळे कोल्हापूर 19) संतोष सरीकर इस्लामपूर 20) प्रणव पाटील कोल्हापूर 21) शंकर सावंत आजरा 22) आयुष महाजन कोल्हापूर 23) अरिन कुलकर्णी कोल्हापूर 24) उमेश कुलकर्णी मुंबई 25) संतोष रामचंद्रे कसबे डिग्रज

 उत्तेजनार्थ बक्षीसे

साठ वर्षावरील जेष्ठ बुद्धिबळपटू

1) माधव देवस्थळी कोल्हापूर 2) सुहास कामतेकर रत्नागिरी 3) राजू सोनेचा सांगली 4) दिलीप कुलकर्णी सांगली 5) अविनाश चपळगावकर सांगली

उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू

1) ईशा कोळी सातारा 2) महिमा शिर्के कोल्हापूर 3) तृप्ती प्रभू कोल्हापूर 4) अरिना मोदी कोल्हापूर 5) संस्कृती सुतार नांदणी 6) वैष्णवी पाटील कोल्हापूर 7) मयुरी सावळकर कोल्हापूर 8) प्रीती दानोळी 9) सृष्टी कुलकर्णी कोल्हापूर 10) अनुजा कोळी कोल्हापूर

*उत्कृष्ट बिगर गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू*

1) अनय दोशी कोल्हापूर 2) सिद्धांत पाटील कामेरी 3) प्रणव हलभावी सांगली 4) सचिन टोकले तासगाव 5) निधी मुळे रत्नागिरी

*उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू*

1) यश गोगटे रत्नागिरी 2) अभिजीत कांबळे सांगली 3) अमोल इंगळे बुलढाणा 4) विनोद सावंत सांगली 5) पुनम चांडक इचलकरंजी

*पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

1) अपूर्व देशमुख सातारा 2) आदित्य कोळी सांगली 3) सई मंगनाईक बेळगाव 4) मानस महाडेश्वर कोल्हापूर 5) अथर्व मगदूम निपाणी 6) महंमदसाद बारस्कर शिरोली 7) प्रणव मोरे कोल्हापूर 8) मधुरा पाटील निपाणी 9) विश्वराज बर्गे सातारा 10) नितीन परीक इचलकरंजी

*तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

1) विक्रमादित्य चव्हाण सांगली 2) राजेश डहाळे बेळगाव 3) अथर्व तावरे इचलकरंजी 4) स्वरूप साळवे गडहिंग्लज 5) आदित्य चव्हाण सांगली 6) अपूर्व ठाकूर अतिग्रे 7) अद्वय मनोलकर बेळगाव 8) प्रथमेश दरक बेळगाव 9) नारायण पाटील कोल्हापूर 10) अवनीश हंडूर कोल्हापूर

अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1) अभय भोसले जांभळी 2) कश्यप खाकरीया सांगली 3) हित बलदवा जयसिंगपूर 4) सिद्धी बुबणे नांदणी 5) अद्विक फडके सांगली 6) आरव पाटील कोल्हापूर 7) सहर्ष टोकले तासगाव 8) प्रथमेश व्यापारी कोल्हापूर 9) अक्षय पवदाद बेळगाव 10) सर्वेश पोतदार कोल्हापूर

नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1) विवान सोनी इचलकरंजी 2) अर्णव पाटील कोल्हापूर 3) वरद पाटील सांगली 4) वेदांत कुलकर्णी पुणे 5) आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी 6) आदित्य ठाकूर अतिग्रे 7) अन्वय भिवरे कोल्हापूर 8) आयुषी घोरपडे सातारा 9) आदित्य घाटे कोल्हापूर 10) अन्वित नांदणीकर सांगली

सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1) प्रज्ञेश घोरपडे सातारा 2) अवनीश जीतकर कोल्हापूर 3) अथर्वराज ढोले कोल्हापूर 4) अद्वैत जोशी बेळगाव 5) शरद पवदाद बेळगाव 6) रुद्र चव्हाण कोल्हापूर 7) रजान अत्तार इचलकरंजी 8) दर्श मंडल बेळगाव 9) अभिराज पाटील सोलापूर 10) आदिराज डोईजड वारणानगर

Comments