दैनिक राशिभविष्य
बुधवार, २७ डिसेंम्बर २०२३
. मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा. हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज चांगला दिवस आहे"
नक्षत्र - आर्द्र. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल चंद्र गुरू योग आर्थिक बाजू भक्कम करून देईन. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कौटुंबिक सौख्य लाभेल. धवृद्धी होईल. येणी वसूल होतील. कर्जे मंजूर होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढवणार कालावधी आहे. शत्रूंचा पराभव होईल. स्पर्धेत यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. संकटातून सुटका होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. दूरचे प्रवास घडतील. शिक्षणात यश.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उद्योग व्यवसायात भरभराट होईल. नवीन संधी चालून येतील. पशु लाभ होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नात्यातून लाभ होतील. दूरचे प्रवास संभवतात. लक्ष्मी प्रसन्न होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. कष्ट अधिक करावे लागतील. कौटुंबिक पातळीवर लक्ष घाला.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अकस्मात लाभ होतील. शेअर्स किंवा लॉटरी मध्ये नशीब अजमावून बघण्यास हरकत नाही.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अनपेक्षित घटना घडतील. आरोग्य सांभाळा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम दिवस आहे. अनुकूल रवी तुम्हाला मान सन्मान प्रदान करतील. संतती सुख लाभेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा लागेल. कुटुंबासोबत सहल घडेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
२७ डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
दांडगा आत्मविश्वास, परोपकारी वृत्ती, भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही लहरी आणि हट्टी आहात. सामाजिक रीतिरिवाज बद्दल तुम्ही आग्रही असतात. तुम्ही न्यायी असले तरी कधीकधी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.इतरांना तुम्ही काहीसे उद्धट आणि शिष्ट वाटतात. उत्तम स्मरणशक्तीचा तुम्हाला वरदान आहे. त्यामुळे जुन्या चांगल्या आणि वाईटही गोष्टी तुम्ही विसरत नाहीत. मान सन्मान मिळालेले तुम्हाला मनापासून आवडतात. वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती आणि परंपरा मिळतात अनेकदा तुम्ही चाकोरी सोडून वागतात आणि त्यामुळे गोत्यात येतात.
उष्णतेचे विकार, पित्त, मूत्राशय याच्या विकारांपासून सावध रहा.
शुभ रंग:- पिवळा.
शुभ दिवस;- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ अंक:- 3, 6, 9.
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment