दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

गुरूवार, ७ डिसेंम्बर २०२३. 







कार्तिक कृष्ण दशमी. शरद ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस" 


चंद्र नक्षत्र - हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. अनेक लाभ संभवतात. आळस झटकून कामाला लागा.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कोर्ट कामासाठी चांगला दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. व्यावसायिक यश लाभेल. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनेक प्रश्न सुटतील. कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  आर्थिक प्रश्न सुटतील. गूढ उलगडतील. सन्मान प्राप्त होतील.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सामाजिक कार्यात भाग घ्याल. यःस मिळेल. कीर्ती पसरेल. धनप्राप्ती होईल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संभ्रम अवस्था निर्माण होईल. नात्यातून उत्तम सहकार्य मिळेल. शेजाऱ्यांशी वाद टाळा. 

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाच्या कार्यात दिरंगाई जाणवेल. चुकीची औषधयोजना होऊ शकते. कौटुंबिक वाद संभवतात.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम दिवस आहे. दबदबा वाढेल. सन्मान मिळतील. मोजके बोलणे हिताचे आहे.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दीर्घकालीन लाभाचे परिणाम मिळतील. कामाचा ताण वाढेल मात्र त्यातून लाभ होतील. 

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत उत्तम दिवस आहे. अनुकूल रवी, मंगळ तुम्हाला राजकीय आणि सर्वच क्षेत्रात यश प्रदान करतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रतिकूल दिवस आहे. मोठे निर्णय नकोत. व्यवसाय/नोकरीत काळजी घ्या. शाब्दिक घोळ नको.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मत्सर त्रास जाणवेल. मोठे निर्णय घेताना योग्य काळजी घ्या. पत्नीशी मतभेद नकोत. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments