पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य "सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ९ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य "सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ९ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री
चार दिवसात गर्दीचा अक्षरशः महापूर , प्रदर्शन स्थळी लोटला जनसागर
प्रदर्शनाच्या आज शेवटचा दिवशी खरेदीसाठी ग्राहक आणी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात ७ लाख शेतकरी व नागरीकांनी भेट दिली. शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन, खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो.आज शेवटच्या दिवशी सोमवार ख्रिसमस नाताळ निमित्त सुट्टी होती. त्यामुळे तपोवन मैदानावर जनसागर लोटला होता. चार दिवसात तांदळाची उंच्चांकी विक्री झाली असून ५० लाखांची उलाढाल ही तांदूळ मधून झाली आहे.महिलां बचत गटांच्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून ३० लाखांची उलाढाल झाली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल ९ कोटीची उलाढाल झाली आहे. विविध शेतीची साहित्य व यंत्रे मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे.
शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील यांनी गेली ४ वर्षांपासून या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा "सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची सुरुवात केली.यावर्षीचे हे ५ वे प्रदर्शन २२ डिसेंबर रोजी सुरू झाले आहे. आज याची २५ डिसेंबर रोजी सांगता अभूतपूर्व गर्दीत झाली.
चार दिवसात कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तोबा गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती.सतेज कृषी प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित २५० कंपन्याचा सहभाग होता. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
प्रदर्शनात साडेपाच फूट लांब शिंग असलेली पंढरपुरी म्हैस, राजा नावाचा जाफराबादी रेडा, कमी उंचीची ४ वर्षे वयाची कुंगनूर जातीची गाय,३ वर्षे ६ महिने वय असलेली ९ लिटर दुध देणारी दानोळी येथील मुऱ्हा जातीची म्हैस, लांब शिंग असलेली पांढरे बैल
अमेरिकन सिल्क जातीची पायावर केस असलेली कोंबडी,७०हजार रुपये किंमतीचा ९७ किलोचा बोकड(पालवं),बिटेल जातीचा बकरा,माडग्याळ मेंढा,भारतीय वंशाची जाड शिंग असलेली काँग्करेज जातीची गाय,शाहू नावाचा घोडा प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले ते पाहण्यासाठी लोकांनी व शेतकऱ्यांनी चार दिवस गर्दी केली होती.कागल मशील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म भाजीपाला व फळे यामध्ये स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास शेतकऱ्यांना मिळाला.
चॅम्पीयन ऑफ द शो
कडलास गावातील विठ्ठल नामदेव पोवार यांची सहा दाती खिलार खोंड
अदात खोंड खिलार गटात
नेर्ली येथील सागर विलास पाटील यांचा खिलार प्रथम क्रमांक व वैभववाडी येथील अजित संजय पाटील यांचा दोन दाती खिलार द्वितीय क्रमांक आला आहे.
*अशा झाल्या आहेत स्पर्धा त्यांचा निकाल*
*भरड धान्य पाक कृती स्पर्धा*
१)सौ, पद्मा सचिन माने (कुंभोज (हातकणंगले)प्रथम क्रमांक
२)सौ. अर्चना अरिहंत दानोबे (शिरढोन) (शिरोब) द्वितीय क्रमांक
३)सौ. शोभालाई सनदेव लोहार (चावरे हालकमंगो) तृतीय क्रमांक
४)सौ. निर्मला अतुल माबी (कुंभोज हातकणंगले वैशिष्ठे चतुर्थ क्रमांक
५)सौ. वैशाली सरदार पाटील (पाडलीखु कावीर) वैशिष्ठे पाचवा क्रमांक ")
*पिकस्पर्धा फळे*
१)नारायण राजाराम पांडव - खुपीरे
२) महादेव शामराव पाटीत लिखे,
३)चवगोंडा दानगोंडा पाटील
उमळवाड
४)विठ्ठल नारायण सरगर पेठ वडगाव
५)पुंडलिक कृष्णा डाफळे हणबरवाडी,
*भाजीपाला*
१) श्री. सुरगोंडा देवगोंडा पाटील आळते
२)दिवाकर बेडेकर जठारवाडी,
३)आप्पांना निजलिंग गुरव माद्याळ
४)शामराव भिमराव मेथे पाटील पाडळी
५) बाळासो दत्तालय मिरजे वडणगे
*फुलपिके*
१) चंद्रकांत बाळासो दानोळे - नांदणी-प्रथम
२)दिपक बाबासो भंगरी - नरंदे
३) जयदीप दशरथ पाटील - शिंगणापूर
४) संतोष शिवाजी कुरळे औरनाळ
५) अनंत सिताराम ओरणेकर - खुपिरे
उसपिके
१) अजित बाबूराव सौदे - वसगडे -
२) श्री. प्रशांत शशिकांत -चंदोबा-दानोळी -
३) श्री. विनायक लक्ष्मण पाटील -बेले
४) श्री. शहाजी श्रीपती पाटील-कासारपुतळे (उतेजनार्थ)
५) बाहुबली रावसाहेब सौदे - वसगडे (उत्तेजनार्थ)
६)भरत महावीर मरजे बुननाळ (उतेजनार्थ)
महाराष्ट्र शासनाच्या कृषि खात्याअंतर्गत कार्यरत असणारे व जिल्हयातील शेतकयांच्या प्रगतीस मोठा हातभार लावणारे तालुका कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक आणि कृषि सहायक यांचा सतेज कृषिसेवारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.याची नावे पुढीलप्रमाणे आहेत
किरण जयसिंग पाटील तालुका कृषि अधिकारी
नंदकुमार आणा मिसाळ मंडळ कृषि अधिकारी, हातकणंगले
नरेंद्र दामोदर माने मंडळ कृषी अधिकारी कसबा बीड
संतोष पाटील,रमेश परीट,नामदेव गिरीगोसावी,सागर भमाणे,सचिन कोळी,प्रदीप गावडे,सुधीर सोळंकुरे,वर्षा भंडारी, राजगोंडा चौगुले आदींचा सत्कार करण्यात आला.
देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलिमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, डी.वाय. पाटील ग्रुप,संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बि-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत,कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे आदींसह टिमचा काटकर यांचा सत्कार करण्यात आला.
सतेज कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात चार दिवसात विक्री झालेला शेतमाल :
1) सेंद्रीय गूळ : 3400kg
2) इंद्रायणी तांदूळ : 5700kg
3) आजरा घनसाळ 12000kg
4) सेंद्रीय हळद : 1600 kg
5) जोंधळा जिरगा तांदूळ : 1000 kg
6) नाचणी : 1500kg
7) विविध बी.बियाणे 600 च्या आसपास kg
Comments
Post a Comment