आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जिह्यातील शेतकऱ्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे - आमदार सतेज पाटील
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जिह्यातील शेतकऱ्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे - आमदार सतेज पाटील
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
भविष्यात कमी होत जाणारी शेतजमीन आणि त्यामुळे वाट्याला येणाऱ्या जमिनीचे कमी क्षेत्र पाहता उपलब्ध शेत जमिनीत योग्य पिकांची लागवड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगतिशील अभ्यास करून जास्तीत जास्त किफायतशीर उत्पादन काढून सक्षम होणे गरजेचे आहे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. सतेज कृषीरत्न व सतेज कृषीसेवारत्न पुरस्कार कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी युवकांनी नोकरीच्या मागे न लागता दुग्ध व्यवसायाला व्यावसायिक चालना देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून युवकांनी या व्यवसायाची कास धरण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेपर्यंत कृषी क्षेत्राचे ज्ञान पोहोचावे आणि या ज्ञानातून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे, यासाठी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही,हे शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथील एका शेतकऱ्याने एकरी १३० टन उसाचे उत्पादन काढून दाखवून दिल्याच त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना आरसा दाखवायचे काम या कृषी प्रदर्शनातून केल जात असल्याचे त्यांनी सांगितले . ग्रामीण भागातील ६० टक्के लोक शेती करतात .त्यातील ८४ टक्के महिला शेतीवर अवलंबून असल्याचेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.आपल्या कुटुंबांतील सदस्यांची वाढ झाल्यामुळे आपण आता एकरातून गुंठ्यात आलोय. या मर्यादित शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाकडून म्हैस खरेदीसाठी ४० हजारांचे कर्ज दिले जाते, तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडूनही बिनव्याजी कर्ज मिळते. अशा शासकीय योजनांचा लाभ घेऊन, शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधली पाहिजे सध्या नोकऱ्यांची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे शेती आणि दूध उत्पादन करणे गरजेचे बनल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी स्वागत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.सूत्रसंचालन प्रा.सुधीर सूर्यगंध यांनी केले तर आभार प्रा.जयवंत जगताप यांनी मानले.
कृषिरत्न पुरस्कार विजेते
सतेज कृषिरत्न पुरस्कार मध्ये
युवराज विठ्ठल कुंभार(कुंभारवाडी त.राधानगरी),
संदीप सुरेश सगुणे (म्हाळुंगे त.गगनबावडा),
सरदार सदाशिव पाटील(रा.साबळेवाडी ता. करवीर),
कृष्णा भाऊ चौगुले(बहिरेवाडी.ता. आजरा),
भरत मरजे(बुबनाल(ता.शिरोळ),
जयवंत मगदूम(केकले ता. पन्हाळा),
बापू कृष्णा जाधव(पट्टणकोडोली ता. हातकणंगले),
सूर्यकांत देसाई(रा.तळेवाडी ता. गडहिंग्लज),
विनोद बेर्डे(उचत ता. शाहूवाडी),
बाबुराव परीट (सुळकुड ता. कागल),
शिवलिंग गावडे (हंबीरे ता चंदगड),
धर्माजी कांबळे (अंतुरली ता भुदरगड),
सुमित दनाने (किनी.ता हातकणंगले),
उषा खोत (निलेवाडी ता. हातकणंगले),
प्रशांत पाटील (कोडोली ता पन्हाळा)
आदी शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
सतेज कृषीसेवारत्न पुरस्कार विजेते
डॉ. पूनम चव्हाण (पशुधन विकास अधिकारी कोल्हापूर)
डॉ. एन. डी.पवार (पशुधन विकास अधिकारी चुये)
सचिन पाटील (पशुधन पर्यवेक्षक कोथळी)
प्रमोद खोपडे (पशुधन पर्यवेक्षक भुयेवाडी)
प्रा.अजय देशपांडे (कृषी महाविद्यालय कोल्हापूर.)आदींना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment