दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 शनिवार, १३ जानेवारी २०२४. 






पौष शुक्ल द्वितीया. हेमंत ऋतू,  राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज उत्तम दिवस आहे" *श्री सिद्धेश्वर यात्रा*   


नक्षत्र: श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मेहनत वाढवावी लागेल. अचानक एखादी समस्या निर्माण होऊ शकते. नोकरीत डोके शांत ठेवून काम करावे.  

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) प्रवासात त्रास संभवतो. घरातील जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल. उधारी वाढेल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिकूल दिवस आहे. मोठे करार आज नकोत. नेहमीची कामे चालू ठेवा.  


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. विनाकारण त्रास संभवतो. गृहकलह टाळा. 

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सत्य बाजू असूनही आरोप होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी गैरसमज टाळा. आरोग्य सांभाळा. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) फारसे मोठे कार्य घडणार नाही. एखादी अप्रिय घटना घडू शकते. वाहन जपून चालवा.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संवाद साधणं महत्वाचे आहे. गैरसमज दूर होतील. कामाचे सेतू उभे राहतील.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. व्यवसाय वाढेल. जुने दुखणे डोके वर काढू शकते.   


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कलाकारांना उत्तम दिवस आहे. नवीन संधी मिळतील. शब्द देताना जपून द्या.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गूढ सुटण्यास हे ग्रहमान मदत करेल. आपले कोण आणि परके कोण हे ओळखाल. राजकीय वाटचाल सुकर होईल.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. आत्मविश्वास कमी होईल. नियोजन बिघडेल. मोठे करार आज नकोत. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामांचा वेग वाढेल. जुनी गुंतवणूक आता मदतीस येईल. शब्द जपून वापरा. घशाचे आजार संभवतात.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


आज दि. १३  रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते.


व्यवसाय:-  आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.


शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments