दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

बुधवार, २४ जानेवारी २०२४ 





पौष शुक्ल चतुर्दशी. हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, घ. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज चांगला दिवस आहे" 


नक्षत्र - पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. अर्थलाभ होईल. अचूक एखादी संधी चालून येईल. पाण्यापासून सावध रहा.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सांपत्तिक स्थान बळकट होईल. वस्त्र आणि दागिन्यांचा लाभ होईल. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल हर्षल अचानक लाभ मिळवून देतील. लोटरीतून यश मिळू शकते. नात्यात प्रशंसा होईल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीत मनासारखी पोस्ट मिळेल. बदलीचे योग् आहेत. तीर्थयात्रा घडेल. राजकृपा अनुभवाल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अत्यंत अनुकूल दिवस आहे. लाभातील चंद्र मौल्यवान वस्तूंची भेट देईन. गूढ उलगडतील. पाण्यापासून सावध रहा. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आवडत्या व्यक्तीची भेट होईल. नोकरीत यश लाभेल. मनासारखी कामे होतील. पत्नीसाठी वेळ द्यावा लागेल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. उद्योग व्यवसायात यश मिळेल. प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. व्यसने टाळा.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) फारसा अनुकूल दिवस नाही. अष्टम स्थानी चंद्र आहे. षष्ठ स्थानी हर्षल आहे. आरोग्य सांभाळा. वाहन जपून चालवा.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) हरवली वस्तू सापडेल. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू तात्पुरता तह करतील. 

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे.  सहावा चंद्र अर्थप्राप्ती करून देईन. सुपीक जमिनीशी संबंध येईल. नात्यातील व्यक्तीची चिंता वाटेल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अकल्पित लाभ होतील. विपुल धनधान्य प्राप्त होईल. पराक्रम गाजवाल. परदेशगमनचे योग आहेत.

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भूमिगत द्रव्यातून लाभ होतील. तलाव/सरोवर यांच्या सन्निध गमन होईल. नफा वाढेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments