शौर्यगाथा छत्रपती शंभूराजांची कीर्तनमालेचा चिपळूण येथे शुभारंभ
चिपळूण दि. ६ सिटी न्यूज नेटवर्क
" शौर्यगाथा छत्रपती शंभूराजांची " श्री स्वामी चैतन्य परिवार , चिपळूण आयोजित चार दिवसीय कीर्तनमालेचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने कीर्तनप्रेमी रसिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
चिपळूण येथील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या
चार दिवसीय भव्य कीर्तनमालेचे दीप प्रज्वलन शुभारंभ प्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती ह.भ .प. श्री. चारुदत्तबुवा आफळेबुवा , श्री स्वामी चैतन्य परिवार संस्थेचे उपाध्यक्ष श्री. समीर देवळेकर , विश्वस्त श्री. सुनील सावंत , श्री. विवेक पटवर्धन यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दीप प्रज्वलनानंतर ह.भ.प. श्री . चारूदत्तबुवा आफळे , कीर्तनमालेतील सहभागी कलावंत श्री. गंगाधर देव ( आॅगॆन ) , श्री .प्रमोद जांभेकर ( व्हायोलीन ) , श्री . मिलिंद तायवाडे ( तबला ) , श्री. मनोज भांडवलकर ( पखवाज ) यांचे आयोजक परिवाराचे वतीने ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुधाकर बेंडके यांच्या हस्ते गुलाब पुष्प व अत्तरकुपी देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित रसिकांमध्ये भाजपचे माजी आमदार श्री.प्रमोद जठार यांची उपस्थिती होती .
उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री.नाना परचुरे यांनी संस्थेच्या कार्याचा व कीर्तनमाला उपक्रमाचा उद्देश सांगताना "शौर्यगाथा छत्रपती शंभूराजांची " कीर्तनमालेचे दुसऱ्या दिवशी पुर्वरंगानंतर चिपळूण येथील संत साहित्याचे अभ्यासक , प्रवचनकार श्री . धनंजय चितळे यांच्या हस्ते ह.भ.प. श्री .आफळेबुवा यांचा डाॅकटरेट पदवी मिळाल्याबद्दल श्री स्वामी चैतन्य परिवाराचे वतीने सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले .

Comments
Post a Comment