दैनिक राशिभविष्य
सोमवार, २९ जानेवारी २०२४
. पौष कृष्ण चतुर्थी. हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - पूर्वा फाल्गुना. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.
"आज वृद्धी दिन" *संकष्टी चतुर्थी* चंद्र उदय मुंबई - रात्री ९.३०, नाशिक रात्री ९.२६.
मेष:- चंद्र हर्षल त्रिकोण योग आहे. अचानक लाभ होतील. शुभ घटना घडतील. शेअर्स मधून लाभ.
वृषभ:- घरगुती कामासाठी खर्च कराल. आनंदी राहाल. भाडेकरूंचा प्रश्न मिटु शकतो.
मिथुन:- मोठे आर्थिक लाभ होतील. अकल्पित सुखद घटना घडतील. वेळेचा सदुपयोग कराल.
कर्क:- समाजाचे नेतृत्व कराल. चांगले काम उभे राहील. धन धान्य वाढेल. नोकरीत उत्तम कामकाज घडेल.
सिंह:- अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. हातून धार्मिक कार्य घडेल. वैज्ञानिक कार्यक्रमात भाग घ्याल.
कन्या:- अजूनही फारशी अनुकूलता नाही. मित्र मंडळी भेटतील. मनापासून खर्च कराल. अप्रिय बातमी समजू शकते.
तुळ:- उत्तम दिवस आहे. वेळ 'न' दवडता कामाला लागा. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.
वृश्चिक:- कर्म स्थानात चंद्र आहे. केलेल्या कर्माचे आज चांगले फळ मिळणार आहे. जुने कौटुंबिक वाद मिटतील.
धनु:- भाग्योदय होतो आहे. अनेक नवीन संधी चालून येतील. नोकरीत बदल संभवतात. उच्च स्थानी जाल.
मकर:- संमिश्र दिवस आहे. नात्यातून मोठे लाभ होतील. एकत्र कुटुंबात सुखद घटना घडतील.
कुंभ:- लेखकांना यश लाभेल. कला प्रांतात चमक दाखवाल. आयुष्याचा अर्थ समजेल. अंतर्मुख व्हाल.
मीन:- उचित घटना घडतील. अडथळे दूर होतील. वक्तृत्व चमकेल. घरातील जेष्ठ व्यक्तींची सेवा करा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment