नूतन मनसे जिल्हाध्यक्ष तसेच शहर अध्यक्ष निवडीप्रित्यर्थ जल्लोषी उद्या (दि.२८) भव्य मोटरसायकल रॅली
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचा इतिहास अधिक जाज्वल्यपणे तेवत ठेवण्यासाठी हिंदू जननायक मा. राजसाहेब ठाकरे यांनी मनसे कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी श्री. राजू दिंडोर्ले व शहर अध्यक्षपदी श्री. प्रसाद पाटील यांची निवड केल्या प्रित्यर्थ कोल्हापूर शहरामध्ये भव्य जल्लोषी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी ताराराणी चौक, कावळा नाका येथून सकाळी १०.३० वा. मोटर सायकल रॅलीचे उद्घाटन लोकसभा संघटक मा. बाळा शेडगे व संपर्क अध्यक्ष जयराज दादा लांडगे यांच्या शुभहस्ते संपन्न होऊन ही रॅली सयाजी हॉटेल टेल टाकाळा- टाकाळा-राजारामपुरी-उमा टॉकीज- मिरजकर तिकटी-महाद्वार रोड शिवाजी चौक-पापाची तिकटी-शनिवार पेठ-दसरा चौक येथे समारोप होणार आहे. याप्रसंगी नूतन जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, राजू पाटील, अमित पाटील व तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील इत्यादी उपस्थित राहणार आहेत..
सदरहू रॅलीचे संयोजन ग्रामीण जिल्हाध्यक्ष गजानन जाधव व नागेश चौगुले यांनी केले आहे. असे पत्रक शहर सचिव निलेश आजगावकर यांनी प्रसिध्दीस दिले.
Comments
Post a Comment