पापाची तिकटी येथे महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

 पापाची तिकटी येथे महात्मा गांधी पुण्यतिथी   निमित्त अभिवादन



कोल्हापूर, दि.३० सिटी न्यूज नेटवर्क 

पापाची तिकटी येथे महात्मा गांधी यांच्या ७६ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त महात्मा गांधी स्मारक समिती व पापाची तिकटी मंडळातर्फे अॅड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

महात्मा गांधींच्या विचारांची देश एकसंघ ठेवण्यासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी आजही देशाला जरुरी आहे असे मनोगत अॅड. धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले. पापाची तिकटी येथील कोल्हापुरातील एकमेव महात्मा गांधी यांच्या अर्ध पुतळ्याची उभारणी चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांच्या आर्थिक मदतीतून व जनतेच्या लोकवर्गणीतून करण्यात आली होती. पुतळ्याचे उद्घाटन २६ जानेवारी १९५१ साली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. 

यावेळी जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, अमोल कुरणे, अभिजीत नलवडे, सुरज साळोखे, उत्कर्ष भंडारे, फिरोज सतारमेकर आदी उपस्थित होते.

Comments