श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे "समग्र ग्रामविकास" : ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
समाजाच्या उन्नतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र कणेरी मठ. आता या मठातर्फे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून समग्र ग्राम विकास ही संकल्पना ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती आज श्री क्षेत्र कणेरी मठाचे अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
"शेती शिक्षण आरोग्य उद्योग आणि सांस्कृतिक" या क्षेत्रात गावे सक्षम व्हावी त्याद्वारे गावाचा विकास व्हावा ही ह्या योजनेची मूळ संकल्पना. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शंभर गावे स्वयंपूर्ण करण्याचे ठरले आहे . या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वीस गावांची निवड करण्यात आली आहे .
या संकल्पनेच्या अंतर्गत ८ फेब्रुवारीला २०२४ रोजी कणेरी मठ येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशीही माहिती अदृश्य कार्ड सिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर ,संचालक गुंडोपंत वड, प्रल्हाद जाधव विवेक सिद आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment