पेपरफुटी घोटाळा, यातील मलईवर कोणाचा डोळा : आक्रोश मोर्चा काढत आपचा सरकारला सवाल


पेपरफुटी घोटाळा, यातील मलईवर कोणाचा डोळा 

 : आक्रोश मोर्चा काढत आपचा सरकारला सवाल


कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क 

गेल्या तीन वर्षात शासकीय नोकरभरती प्रक्रियेत अनेक गोंधळ झाले. म्हाडा, आरोग्य, तलाठी व महाज्योती पीएचडी परीक्षेचा पेपर फुटले आहेत. पेपरफुटी प्रकरणे राजरोसपणे सुरु आहेत. काही प्रकरणांमध्ये खुद्द परीक्षा परिषदेचे अध्यक्ष सामील असल्याचे समोर आले आहे, परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करून लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळत आहे.


या पेपरफुटी विरोधात आम आदमी पार्टीने आक्रोश मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. "पेपरफुटी घोटाळा, यातील मलईवर कोणाचा डोळा", "शासन आपल्या दारी, पेपरफुटीचा कोण रे कारभारी" अशा आशयचे फलक आंदोलनात झळकत होते.


पेपरफुटीची प्रकरणे राज्यात वाढत असून यामुळे बेरोजगार परीक्षार्थी वेठीला धरले जात आहेत. व्यापम पासून सुरु झालेले पेपरफुटीचे लोण महाराष्ट्रात पसरत आहे. ही सर्व प्रकरणे भाजप सरकार असलेल्या राज्यातच का घडत आहेत असा सवाल आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.


जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, प्रकाश सुतार, सुदर्शन कदम, किरण साळोखे, अभिजीत कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, संजय सूर्यवंशी, दयानंद मोरे, कुमाजी पाटील, ओंकार पताडे, समीर लतीफ, रमेश कोळी, उमेश वडर, शुभंकर व्हटकर, स्मिता चौगुले, आनंदराव चौगुले, इस्तर कांबळे, रवींद्र राऊत, दिग्विजय चिले, रवींद्र ससे, राजेश खांडके, विलास पंदारे, अभिजीत देसाई, मनोहर नाटकर, प्रदीप माने, रावसाहेब पाटील

Comments