परिवर्तन फाउंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्य अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांचा सत्कार

 परिवर्तन फाउंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्य अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांचा सत्कार



कोल्हापूर, दि २७ सिटी न्यूज नेटवर्क 

 भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे डिन (अधिष्ठाता) डॉ. प्रकाश गुरव यांनी विविध ठिकाणी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील  उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना कोल्हापूरकर नागरिक व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने जीवनरक्षक धन्वंतरी  सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. 

याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शिशिर मुरगुंडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, डॉ. झहीर आदी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे विविध डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख, डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक तसेच छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर परिवर्तन फाउंडेशन एन.जी.ओ.च्या वतीने हॉस्पिटल परिसरातील रुग्णाच्या नातेवाईकांना,नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले.

Comments