"आशाये" : रोटरी कॉन्फरन्स दोन फेब्रुवारी पासून कोल्हापुरात
कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापुरात रोटरी परिवारातील सदस्या साठी पर्वणी ठरणारी "आशाये" ही 65 की रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 ची कॉन्फरन्स 2,3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी कोल्हापुरात सुवर्णभुमी लॉन शिरोली जकात नाका या ठिकाणी होणार आहे. भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या शुभहस्ते आणि सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पूज्य श्री अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता या कॉन्फरन्सचे उद्घाटन होईल अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे गव्हर्नर नासिर बोरसदवाला आणि कॉन्फरन्स चेअरमन रो. राजीव परीख, कॉन्फरन्स कौन्सलर, डॉ वासुदेव देशिंगकर, सचिव विक्रांत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कॉन्फरन्सबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, रोटरी ही जागतिक पातळीवर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी संस्था आहे. रोटरी परिवारातील सदस्यांचे प्रबोधन व्हावे, विविध विषयातील नवनवीन माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, एकमेकातील संवाद वाढावा, या उद्देशाने दरवर्षी होणारी कॉन्फरन्स यावेळी कोल्हापुरात संपन्न होत आहे. कोल्हापूर, सांगली रत्नागिरी , सिंधुदुर्ग, सावंतवाडी, संपूर्ण गोवा याबरोबरच हुबळी, धारवाड, बेळगाव या उत्तर कर्नाटक राज्यातील 2 हजारहून अधिक रोटेरियन या कॉन्फरन्स मध्ये सहभागी होत आहेत.
उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध आवाजाचे जादूगार श्री. चेतन सशीतल हे आपल्या आवाजाच्या कलेने सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
कॉन्फरन्सच्या दुसऱ्या दिवशी आयडीबीआय बँकेचे चेअरमन टी. एन. मनोहरन हे "सत्यम प्रकरणातील बोध", तर ब्रम्हाकुमारी परिवारातील आतरराष्ट्रीय स्तरावरील वक्त्या राजयोगिनी डॉ. बी.के सुनिता दीदी या "सुंदर जीवनाचा मार्ग", रिबेका मेंडोजा (अमेरिका) या "माणुसकीचा पाया", तसेच प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ.सुरज पवार " यशस्वी जिवनाचा मार्ग "तसेच प्रसिद्ध लेखक ग्रीनस्टोन लोबो हे "शात्रोक्त ज्योतिषकला" यावर मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळच्या सत्रात भारताचे माजी माहिती आयुक्त उदय माहूरकर हे "भारतासमोरील सांस्कृतिक आव्हान" या विषयावर संवाद साधणार असून अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. विश्वास नांगरे पाटील हे "मन में है विश्वास" या
विषयातून आपला प्रेरणादायी प्रवास सवासमोर उलगडणार आहेत. या दिवशी मन 2022-23 या वर्षातील डिस्ट्रिक्ट अवॉर्डचे वितरण होणार आहे.
कॉन्फरन्सच्या तिसऱ्या दिवशी डॉ. जी. एस कुलकर्णी हे "दीर्घायुष्याचा मंत्र", तर संदीप गादिया हे "सायबर क्राईम" आणि प्रख्यात लेखक आशुतोष रारावीकर "आनंददायी पथप्रकाश" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या कॉन्फरन्स मध्ये विविध प्रदर्शनीय स्टॉल्स देखील ठेवलेले आहेत त्याचबरोबर दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार आहेत.
या कॉन्फरन्सकरीता डी. वाय. पाटील ग्रुप, भीमा बिजनेस ग्रुप, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, एस.बी रिशेलर्स, श्रीराम फाउंड्री, सरोज फाउंड्री, मेनन अँड मेनन लिमिटेड, अमृता इंडस्ट्रीज, सुदर्शन जीन्स, माय हंडाई, ट्रेंडी व्हिल्स ( महिंद्रा कार), डॉ. सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
ही कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी कॉन्फरन्स सचिव प्रसन्न देशिंगकर, खजानिस बी.एस शिंपुकडे, रो. राहुल कुलकर्णी, ऋषिकेश खोत, दिव्यराज वसा, सचिन मालू, दिलीप शेवाळे, श्रीकांत मोरे, गौरव शहा, बाळासाहेब कडोलकर, मानसिंग पानसकर, शरद पाटील, चंदन मिरजकर, अरविंद कृष्णन, सुजाता लोहिया सिद्धार्थ पाटणकर, विनोद कांबोज, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. दिग्विजय पाटील, राजशेखर संबर्गी, सचिन झंवर, डॉ. महादेव नरके यांची टीम कार्यरत आहे.
Comments
Post a Comment