मराठा समाजाला टिकणारे व शाश्वत आरक्षण दिल्याबद्दल भाजपाच्या वतीने आनंदोत्सव

 मराठा समाजाला टिकणारे व शाश्वत आरक्षण दिल्याबद्दल भाजपाच्या वतीने आनंदोत्सव





कोल्हापूर दि.२७ सिटी न्यूज नेटवर्क 

 गेले अनेक वर्षे मराठा समाज मराठा आरक्षणासाठी झगतड आहे. विविध स्तरावर प्रयत्न सुरू असताना मराठा समाजाला माजी मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने टिकणारे आरक्षण दिले परंतु महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्वोच्च न्यायलात ही बाजू मांडू न शकल्याने हे आरक्षण रद्द झाले परंतु पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जोर वाढू लागल्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार यांनी मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मान्य करून त्या संदर्भात अद्यादेश काल तयार करून मुंबईत उपस्थित असणाऱ्या संपूर्ण मराठा समाजा समोर तो वाचून दाखवण्यात आला त्यानंतरच मराठा आरक्षण आंदोलन मागे घेण्यात आले. 

मराठा समाजाने मागणी केलेल्या सर्व मागण्या या आदेशाद्वारे पूर्ण झाल्यामुळे सर्व मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे. याबद्दल आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्यावतीने महाद्वार चौक येथे साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजाला आश्वासक आरक्षण देणाऱ्या महायुती सरकारचा विजय असो, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी याप्रसंगी दिल्या. 

जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी आपल्या प्रास्ताविकात या सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास असल्याचे सांगितले. सरचिटणीस गायत्री राऊत, जिल्हा चिटणीस संगीता खाडे यांनी या निर्णयाचे स्वागत करत आजचा दिवस मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण कायद्यात टिकेल असे आरक्षण दिल्याबद्दल आंनद व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले,  मराठा समाजाचे नेतृत्व करणारे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील  यांना अपेक्षित असनारे तसेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण ठरणारे आरक्षण महायुती सरकारने दिल्याबद्दल मनस्वी आंनद होत असल्याचे नमूद केले. 

याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, काँग्रेसच्या काळात प्रत्येक समाजात ठेढ निर्माण करून समाज अशांत करण्याचे व स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यानी अनेक वर्षे केले परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचे विविध प्रश्न व आरक्षणा संदर्भात योग्य तो मार्ग काढण्याचे काम महायुती सरकारने केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांनी अतिशय कुशलतेने हा प्रश्न सोडवल्या बद्दल त्यांचे सर्व समाजातून कौतुक होत आहे.

प्र का सदस्य राहुल चिकोडे यांनी स्वातंत्र्या नंतर वर्षे काँग्रेसी सरकार सत्तेत होते पण मराठा समाजला आरक्षण न देता हा प्रश्न कित्येक वर्षे मतांच्या राजकारणासाठी भिजत ठेवल्याचे नमूद केले मराठा समाजाचे मुख्यमंत्री असलेले शरद पवारांसारखे नेते देखील या प्रश्नी लीड घेऊन निर्णया पर्यंत येऊ शकले नाहीत. त्यामुळे सध्याच्या राम राज्याच्या सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हा कार्यक्रम सदस्य राहुल चिकोडे ,  माजी नगरसेवक अजित ठाणेकर , विजय खाडे , विजय सरदार,  किरण नकाते सरचिटणीस डॉक्टर राजवर्धन संजय सावंत गायत्री राऊत हेमंत आराध्ये शैलेश पाटील धनश्री तोडकर अमर साठे संगीता खाडे रुपाराणी निकम सयाजी आळवेकर सतीश आंबर्डेकर नरेंद्र पाटील दिलीप बोन्द्रे सतीश कुलकर्णी सतीश रांगोळे अशोक लोहार निरंजन शिंदे नजीर देसाई ऍड संपतराव पवार दिलीप मेत्राणी किरण कुलकर्णी डॉ श्वेता गायकवाड पार्टे विश्वजित पोवार संग्राम जरग विवेक वोरा हर्षशांक हर्चितकर अनिल कोळेकर महेश पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments