हार्वेस्टरला सबसिडी देण्यासाठी प्रयत्न करणार - उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची भीमा कृषी प्रदर्शनात माहिती

 हार्वेस्टरला सबसिडी देण्यासाठी   प्रयत्न करणार - उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची भीमा कृषी प्रदर्शनात माहिती




इथेनॉल प्रकल्पाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रोत्साहन दिले पाहिजे खासदार धनंजय महाडिक यांची अपेक्षा



*प्रदर्शनात  बेस्ट ऑफ द चॅम्पियन ठरला हरियाणा येथील नरेंद्र सिंह यांचा गोलू २ मुऱ्हा जातीचा रेडा




चॅम्पियन ऑफ द शो नेर्ली येथील सागर विलास पाटील यांचा कोसा खिलार खोंड ठरला.


कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

  हार्वेस्टरला सबसिडी देण्याचा निर्णय  लवकरच घेतला  जाईल त्यासाठी प्रयत्न सुरू  असल्याची माहिती  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारोप व  बक्षीस वितरण कार्यक्रमात दिली. भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती तंत्रज्ञान याची ओळख करून दिली जाते.याचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधून वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घ्यावे असे आवाहनही  नामदार अजित पवार यांनी केले.

आज शेती क्षेत्रासमोर अनेक अडचणी आहेत.  अवकाळी पाऊस,  वातावरणात बदल होत चाललेले आहेत त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झाला असून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी आणि त्यांना शासन स्तरावर मदत होण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील असल्याचे ना.पवार यांनी सांगितले. 

आज दूध व्यवसाय द्राक्ष व्यवसाय अडचणीत आलेले आहेत ग्राहकां च्या  फायद्यासोबत उत्पादकाचाही  फायदा होणे आवश्यक आहे याचा विचार करून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्याचा शासन स्तरावर प्रयत्न चालू असल्याचे ना.पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांनीही नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शेती करण्यावर भर दिला पाहिजे.येणारा काळ शेतीमध्ये बदल करण्याचा काळ असून त्या काळानुरूप शेतकऱ्यांनी नवनवीन अवजारांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. त्यासाठीच हार्वेस्टरला सबसिडी देण्याकरता आम्ही  प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शिवाय शेतकऱ्यांनी दर्जेदार पीक बाजारात आणणे गरजेचे असल्याचेही त्यांनी  सांगितले. यावेळी ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते

बेस्ट ऑफ द चॅम्पियन हरियाणा येथील नरेंद्र सिंह यांचा गोलू २ मुऱ्हा जातीचा रेडा ठरला


चॅम्पियन ऑफ द शो नेर्ली येथील सागर विलास पाटील यांचा कोसा खिलार खोंड ठरला.


भीमा जीवन गौरव पुरस्कार डॉ.सुनील बाबुराव काटकर यांना  देण्यात आला


 

यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज महिला पुरुषांच्या बरोबरीने शेती करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी गाव पातळीवर सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सुविधांचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा असे सांगितले.


यावेळी प्रास्ताविक पर भाषण करताना खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा कसा होईल याची माहिती दिली जाते यातून शेतकऱ्यांना वेगवेगळे ज्ञान मिळते असे सांगून आज पाऊस कमी पडत आहे, पाणीटंचाई आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हान आहेत

ही आव्हाने पेलण्यासाठी अनेक शासकीय माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते. शिवाय सध्या साखर कारखाने अडचणीत आहेत इथेनॉलचे प्रकल्प महत्त्वाचे आहेत इथेनॉल प्रकल्पाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रोत्साहन दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.साखर कारखान्यांनी इथेनॉल  निर्मितीला प्राधान्य देणे आवश्यक आहे असे सांगितले.


सांगता  व बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी व्यासपीठावर कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक,आमदार राजेश पाटील,राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित नाना कदम, आदिल फरास,राहुल चिकोडे,सौ. रूपा राणी निकम,सौ.अरुंधती महाडिक,पृथ्वीराज महाडिक.विश्वराज महाडिक, रिलायन्स पॉलिमर्सचे सत्याजित भोसले आदी उपस्थित होते.यावेळी आभार कृष्णराज महाडिक यांनी मानले.


आज प्रदर्शनात देण्यात आलेले पुरस्कार


कृषी सेवारत्न अधिकारी व कर्मचारी


सुनीता पांडुरंग लोकरे,विठू भरमा खोत,चंद्रशेखर सीताराम सुळगांवकर,रामचंद्र भगवान पाटील,उमेश श्रीपती सकटे, डॉ.नीलकुमार ऐतवडे,मंगल परीट,मोहिनी प्रकाश वाळेकर, बंडा कुंभार,हरिदास डाफळे 



कृषी तंत्रज्ञान आदर्श मॉडेल उभारणी पुरस्कार


सुपरकेन व ऊस पाचट मॉडेल तालुका कृषी अधिकारी करवीर (प्रथम क्रमांक)

अपघात विमा तालुका कृषी अधिकारी भुदरगड आणि आयएमपी मॉडेल तालुका कृषी अधिकारी कागल यांना (विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला).

व्हर्टीकल्चर मॉडेल तालुका कृषी अधिकारी हात गले हातकणगले (तृतीय क्रमांक)


जिजामाता शेतीभूषण पुरस्कार

सेंद्रिय शेतीवर नावीन्यपूर्ण अवलंब केलेल्या आजरा येथील सौ.सुप्रिया युवराज पाटील(प्रथम क्रमांक)

पश्चिम महाराष्ट्रातील पहिला स्पिरूनीलिना शेवाळ प्रकल्प राबविलेल्या सौ.दिपाली कुलदीप खोत (द्वितीय क्रमांक)

दोन एकर शेतीत ऊस आंतरपीक भाजीपाला लागवड केलेल्या नागाव येथील सौ. सुजाता रंगराव तोरस्कर (तृतीय क्रमांक)



पीक स्पर्धा भाजीपाला निकाल

मध्याळ येथील आप्पांना निजलिंग गुरव यांची संकेश्र्वरी लाल मिरची आणि नांदणी येथील संदेश भरत पाटील यांची हिरवी मिरची यांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला. तर तळसंदे येथील दिपक राजाराम वांगीकर यांचा ( कोबी द्वितीय क्रमांक), दानोळी येथील राहुल तात्यासो पाराज (घेवडा तृतीय क्रमांक)


अनिरुद्ध हरी नाईक यांच्या विदेशी भाजीपाला(प्रथम क्रमांक),

सिधनेली येथील अमित बाबुराव मगदूम आणि बिरदेववाडी येथील संभाजी राजाराम खरात यांचा विदेशी भाजीपाला यांना विभागून (तृतीय क्रमांक)देण्यात आला.तर सावर्डे तर्फ येथील राहुल बळवंत बच्चे यांच्या विदेशी भाजीपाला यास (तृतीय क्रमांक)देण्यात आला.

मोजे वडगाव येथील भाऊसो आण्णा सो वाकरेकर यांचा (माईनमुळा प्रथम क्रमांक)

मुंगळी येथील रमेश पराप्पा यांची (खाऊची पाने द्वितीय क्रमांक)

कुंभारवाडी येथील युवराज विठ्ठल कुंभार यांचा शाबूकंद यांच्या भाजीला यास तृतीय क्रमांक मिळाला आहे.आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


याचबरोबर बिनदाती अदात खिलार खोंड गट,दोन दाती खिलार खोंड गट,  सहा दाती खिलार खोंड गट, जूळूक खिलार खोंड, अदात खिलार कालवड, दोन दाती खिलार कालवड, चार दाती खिलार कालवड,  खिलार गाय गट, गीर गाय गट,काँकरेज गट, लाल कंधारी कालवड गट,लाल कंधारी गाय गट, मुरहा  रेडा गट,मुरा रेडी गट, पंढरपुरी म्हैस गट आदी  पुरस्कार देण्यात आले.

Comments