रिलायन्स जिओची प्रजासत्ताक दिन ऑफर
• 2999 च्या रिचार्जवर 3 हजारांहून अधिक किमतीची कूपन जिंकण्याची संधी
• ऑफर 31 जानेवारीपर्यंत सुरू राहील
कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क
रिलायन्स जिओने आपल्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी प्रजासत्ताक दिनाची ऑफर आणली आहे. ऑफर अंतर्गत 2999 रुपयांचा रिचार्ज केल्यावर ग्राहकाला 3 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कूपन मिळतील. ही कूपन खरेदी, प्रवास आणि खाद्यपदार्थांची बिले भरण्यासाठी वापरली जाऊ शकतात. ग्राहकाने जिओचा प्लॅन रिचार्ज केल्यावर लगेचच त्याला मिळणारे कूपन माय जिओ अॅपमध्ये दिसू लागतील. या ऑफरचा लाभ 31 जानेवारीपर्यंतच घेता येईल.
शॉपिंग केल्यास ग्राहकाला रिलायन्सच्या आजिओ अॅपवरून 2499 रुपयांच्या किमान खरेदीवर 500 रुपयांची सूट मिळेल. तसेच, ग्राहकांना तिरा मधून सौंदर्य उत्पादने खरेदी करण्यावर 30% सूट मिळेल जी कमाल 1000 रुपयांपर्यंत असू शकते. रिलायन्स डिजिटल वरून किमान रु 5000 च्या खरेदीवर 10% सवलत मिळेल, रिलायन्स डिजिटल वर कमाल सवलत मर्यादा रु 10,000 पर्यंत मर्यादित आहे.
प्रवास: तुम्हाला ixigo द्वारे हवाई तिकीट बुक करण्यावर रु. 1500 पर्यंत सूट मिळेल. एका प्रवासी तिकिटावर 500 रुपये, 2 प्रवाशांना 1000 रुपये आणि 3 प्रवाशांसाठी 1500 रुपये सवलत निश्चित करण्यात आली आहे. खाद्यप्रेमींना स्विगी अॅपद्वारे खाद्यपदार्थ बुक करून 125 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. पण ऑर्डर किमान 299 रुपये असावी.
अधिक कूपन जिंकण्यासाठी ग्राहक त्याच्या नंबरवर हवे तितके रिचार्ज करू शकतो. या ऑफर अंतर्गत जिंकलेली कूपन दुसऱ्या जिओ नंबरवर ट्रान्सफर करता येणार नाही. तथापि, कूपन मित्र/कुटुंबासोबत शेअर केले जाऊ शकतात.
.jpeg)
Comments
Post a Comment