दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

सोमवार, २२ जानेवारी २०२४. 




पौष शुक्ल द्वादशी. हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


चंद्र नक्षत्र - मृग.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ/मिथुन. 


"आज शुभ दिवस" 


मेष:- प्रशंसा होईल. कीर्ती पसरेल. आर्थिक लाभ होतील. राजकृपेचा लाभ होईल.

     

वृषभ:- उत्तम धनलाभ होईल. अधिकार वाढतील. मत मतांतरे मिटतील. अनैतिक मार्ग टाळा.    

 

मिथुन:- प्रिय व्यक्ती नाराज होऊ शकते. चोरीचे भय आहे. श्री दत्तगुरु अनुकूल फळे देतील.  


कर्क:- संमिश्र दिवस आहे, नोकरीच्या  ठिकाणी विनाकारण वादविवाद संभवतात. उग्रकार्य टाळा.

 

सिंह:- उत्तरार्ध अधिक चांगला आहे. प्रेमात यश मिळेल. मात्र शेअर्स मध्ये नुकसान संभवते.  

  

कन्या:- नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. पुण्य काम घडेल. वाहन दुरुस्ती करावी लागेल.   

 

तुळ:- दिवसाचा पूर्वार्ध प्रतिकूल आहे. मात्र दुपारनंतर अनुकूलता वाढेल. उधारी वाढेल. फळ मिळण्यास उशीर लागेल.

 

वृश्चिक:- दिवसाचा पूर्वार्ध उत्तम आहे. कोर्ट कामात यश मिळेल. सामाजिक करीत सहभागी व्हाल. चैनीवर खर्च कराल.


धनु:- सप्तमी स्थानी चंद्र आहे, त्याचा शुक्राची प्रतियोग आहे. मन अस्वस्थ राहील. भिन्न लिंगी व्यक्तीकडून त्रास संभवतो.  

 

मकर:- संमिश्र दिवस आहे. स्वतःच्या आवडीसाठी खर्च कराल.  काही शंका उपस्थित होतील.      

 

कुंभ:- अनुकूल शुक्र पंचमातील चंद्राशी प्रतियोग करत आहे. वस्त्रलाभ होईल. नवीन प्रयोग नकोत. अंदाज चुकू शकतात.

 

मीन:- अनुकूल दिवस आहे. छोटे प्रवास घडतील. आनंद यात्रेत सहभागी व्हाल. मान सन्मान मिळतील.  


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments