रिलायन्स ज्वेल्स’तर्फे व्हॅलेंटाईन डे 2024 निमित्ताने नवीन कलेक्शनचे अनावरण
कोल्हापूर १३ सिटी न्यूज नेटवर्क
व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने, भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेला रिलायन्स ज्वेल्स एक विशेष संग्रह (कलेक्शन) घेऊन आला आहे. हा उत्सव जगभरात सहचर साजरा करेल. व्हॅलेंटाईन डे’ची अस्सल भावना साजरी करताना, रिलायन्स ज्वेल्स’च्या वतीने 14 कॅरेट यलो गोल्ड, रोझ गोल्ड आणि हिऱ्यांतील उत्कृष्ट घडणावळीच्या अंगठ्या, कपल बँड आणि पेंडंटचे व्हॅलेंटाईन डे विशेष संकलनाचे अनावरण करण्यात आले. हे दागिने रोजच्या पोशाखासाठी आदर्श असून या जोडप्यात एकमेकांसाठी असलेल्या प्रेमाची सतत आठवण करून देतात. या कलेक्शनमधील रिलायन्स ज्वेल्सच्या विशिष्ट डिझाईनच्या दैनंदिन देखणेपणाला उठाव देण्यासाठी शैली आणि आरामाचा समावेश करण्यात आला आहे.
एका स्त्रीने नातेसंबंध वृद्धिंगत करत त्यात आणलेल्या चकाकी आणि सौंदर्यात भर घालण्यासाठी हा संग्रह अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे. तसेच हे कलेक्शन तिच्या जीवनाशी निगडीत विविधांगी प्रवासातील लवचिकतेचा सन्मानदेखील करते. ठाशीव ते अत्याधुनिक आणि गुंतागुंतीच्या रचना असलेल्या वस्तूंपासून, जोडीदाराकरिता मजबूत नवीन दृष्टिकोनातून स्त्रिया नातेसंबंधात जी ताकद आणू शकतात त्याचे हे प्रतिबिंब आहे. हा संग्रह रिलायन्स ज्वेल्सच्या #MyStrongerHalf या नवीन कॅम्पेनशी सुसंगत असून आयुष्यातील सर्व चढ-उतारांत पुरुषांना प्रोत्साहित करणे तसेच पाठिंबा देण्यासाठी महिलांचे अस्तित्व साजरा करण्याचे समर्थन करणारा आहे.
व्हॅलेंटाईन डे’ने नेहमीच खऱ्या प्रेमाचे दर्शन घडविले आहे. एका जोडप्याने परस्परांशी प्रस्थापित केलेले बंध, त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम आणि कौतुक दर्शवते. आजच्या जगात अनेक भूमिका बजावणाऱ्या महिलांचे सामर्थ्य आणि कर्तृत्वाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रिलायन्स ज्वेल्सने हा संग्रह सादर केला आहे.
रिलायन्स ज्वेल्स ग्राहकांना ऑनलाइन आणि निवडक दुकानांमध्ये भव्य संग्रह शोधण्याचे आमंत्रण देते.
रिलायन्स ज्वेल्सबद्दल
रिलायन्स ज्वेल्स हा रिलायन्स रिटेल लिमिटेडचा भाग असून जवळपास 200+ शहरांत शॉप-इन-शॉप्स तसेच 400+ दालने चालवितो. हा ब्रॅंड सोने, हिरे आणि चांदी दागिन्यांचा अप्रतिम संग्रह घेऊन आला आहे. रचना आणि हस्तकलेवर लक्ष केंद्रित करून, या ब्रँडचे उद्दिष्ट आपल्या ग्राहकांना कला, हस्तकला आणि समृद्ध भारतीय वारशापासून प्रेरित विशिष्ट आणि अद्वितीय डिझायनर संग्रह प्रदान करण्याचे आहे.
कृपया अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा https://reliancejewels.com/

Comments
Post a Comment