मुख्यमंत्री ना.मा..एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात महाआरोग्य शिबिरे; हजारो रुग्णांनी घेतला लाभ

 

मुख्यमंत्री ना.मा..एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात महाआरोग्य शिबिरे; हजारो रुग्णांनी घेतला लाभ



कोल्हापूर दि.०९ सिटी न्यूज नेटवर्क 

शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांचा आजचा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरला. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा निर्धार समस्त शिवसैनिकांनी केला होता. याअनुषंगाने शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध आरोग्य विषयक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबविले जाणार असून, मा.मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेनेच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.


या उपक्रमांअंतर्गत कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील नामांकित रुग्णालयांच्या माध्यमातून विविध रोगांवरील मोफत तपासण्या, पुढील उपचाराकरिता मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा लाभ हजारो गरजू रुग्णांनी घेतला असल्याची माहिती युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी दिली.


या उपक्रमाअंतर्गत काल विश्वशांती चौक कनाननगर, सदर बाजार हौ.सोसायटी सदरबाजार, मातंग वसाहत राजारामपुरी २ री गल्ली या ठिकाणी आरोग्य शिबिरे झाली तर आज समाज मंदिर सिद्धार्थ नगर, राजाराम चौक गंजीमाळ, बुद्धविहार विचारेमाळ आदी ठिकाणी आरोग्य शिबिरे पार पडली. उद्या दि.१० फेब्रुवारी २०२४ सकाळी ९ ते दुपारी २ वा.पर्यंत  वारेवसाहत मंगळवार पेठ, आंबेडकर नगर कसबा बावडा या ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.


Comments