महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मा. श्री एकनाथजी शिंदे .साहेब, यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार व युवा नेते श्री ऋतुराज क्षीरसागर , पुष्कराज क्षीरसागर यांच्या पुढाकाराने रिंग रोड फुलेवाडी येथील समर्थ श्रावणी केअर सेंटर या वृद्धाश्रमात केक कापून व सर्व वयोवृद्धांना गोडाचे जेवण करून वाढदिवस साजरा केला.
साहेबांना त्यांच्या दीर्घ व निरोगी आयुष्याचा आशीर्वाद वृद्धाश्रमातील सर्व लोकांनी दिला. वृद्ध लोकांविषयी असणारी आस्था व आपुलकी, त्यांच्याविषयी वाटणारी काळजी साहेबांनी "वयोश्री "ही योजना आणून त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम दाखवुन दिले आहे. यानिमित्ताने उपस्थित सर्व लोकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी श्री सुजित भाऊ चव्हाण. जिल्हाप्रमुख. श्री शिवाजीराव जाधव. महानगर प्रमुख, श्री रमेश खाडे., उपजिल्हाप्रमुख. श्री सुरेश माने. उपशहर प्रमुख, श्री अमोल माने. माजी नगरसेवक,श्री बंटी पाटील ,उपशहर प्रमुख, श्री श्रीकांत पवार उपशहर प्रमुख.महिला शहर प्रमुख, सौ अमरजाताई पाटील .निवेदिता तोरस्कर. उपशहर प्रमुख युवासेना यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला

Comments
Post a Comment