दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

रविवार, १८ फेब्रुवारी २०२४







माघ शुक्ल नवमी/दशमी. शिशिर ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे" 


चंद्रनक्षत्र - रोहिणी/मृग. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ/मिथुन. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उधारी वसूल होईल. वारसा हक्काने लाभ होतील. कठोर बोलणे टाळा. नोकरीत कामाचा ताण वाढेल.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) लक्ष्मी प्रसन्न होईल. स्वभावात स्थिरता येईल. व्यावसायिक दृष्टिकोन वाढेल. दानधर्म कराल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) हरवलेली वस्तू सापडेल. मात्र खर्चात टाकणारा दिवस आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.    


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. स्पर्धेत बाजी माराल. शत्रू पराभूत होतील. अनोळखी इसमकडून फायदा होईल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सुटीचा असली तरी कामावर रुजू व्हावे लागेल. शाब्दिक युद्ध जिंकाल. कनिष्ठांचे सहकार्य लाभेल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. बौद्धिक क्षेत्रात मुशाफिरी कराल. लॉटरीत यश मिळेल. न्यायी व्हाल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कार्तिक लाभ होतील. छोटी सहल घडेल. पाळीव पशूंचा स्नेह अनुभवाल. संकट टळेल.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आवडता छंद जोपासाल. पत्नीसोबत सहल घडेल. खरेदी होईल. लेखकांना यश.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) काही वेळेस कठोर होणे भाग असते. आज ती वेळ येणार आहे. सकाळ आनंदाची असणार आहे. 

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कार्यकुशलता दिसून येईल. कष्ट वाढतील. संततीचे परदेश गमन होऊ शकते. बुद्धिमत्ता कामास येईल.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) घरगुती कामात वेळ जाणार असला तरी प्रवासातून लाभ होतील. वेळेचे अचूक नियोजन करावे लागेल. पाहुणे येतील. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम आर्थिक लाभ होतील. विचार विनिमय करून निर्णय घ्याल. वाहन सौख्य लाभेल. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments