माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या दोन दिवसीय राज्यव्यापी महा अधिवेशनाचा भव्य शुभारंभ कोल्हापूर येथे संपन्न
या राज्यव्यापी महा अधिवेशनात महत्त्वाचे सहा ठराव संमत......
कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क
शिवसेनेच्या दोन दिवसीय राज्यव्यापी महा अधिवेशनचा महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापुरात भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी महत्त्वाचे सहा ठराव सुद्धा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमताने पारित केले असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी माननीय उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात 6 ठराव पारित करण्यात आले असून श्रीराम मंदिर उभारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा पहिलाच ठराव पारित करण्यात आला. देशाची प्रगती होण्यासाठी त्यांनी काम केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अभिनंदनाचा दुसरा ठराव पारित करण्यात आला. तिसरा ठराव देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या संदर्भात होता काश्मीर बाबत ३७० कलम रद्द संदर्भात घेतलेला निर्णय केंद्रशासित करण्याचा घेतलेला निर्णय तसेच महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला ऊर्जेत अवस्था आणण्याचा आणण्यासाठी घेतलेले निर्णय यासाठी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सुद्धा पारित करण्यात आला आहे. चौथा आणि महत्त्वाचा ठराव म्हणजे वर्षभरात एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राला ज्या ज्या योजना दिलेल्या आहेत, त्या योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवलेल्या आहेत सर्वसामान्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनचा ठराव पारित करण्यात आला आहे. तसेच पाचवा ठराव हा राजकीय ठराव असून लोकसभेची निवडणूक महायुतीनेच आम्ही लढणार आहोत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष ही आमची महायुती आहे या महायुतीला 48 जागा खासदारकीला जिंकण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत मिशन 48 यशस्वी करण्याचा ठराव पारित करण्यात आला, तर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सुरुवात केली त्या वेळेपासून शिवसेनेच्या वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही लोकांना त्याचा विसर पडला असेल पण एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन काम करत आहेत. ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे अशाना पुढच्या वर्षीपासून शिवसन्मान पुरस्कार देण्याचा ठराव संमत करण्यात आला.
ते सहा ठराव.....
१) शिवसेना नेते दत्ताजी साळवी या नावाने उत्कृष्ट कामगार पुरस्कार दिला जाईल.
२) शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या नावाने नाविन्यपूर्ण उभारता उद्योजक पुरस्कार दिला जाईल.
३) शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांच्या नावाने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दिला जाईल
३) शिवसेना नेता दत्ता नलावडे यांच्या नावाने आदर्श शिवसैनिक पुरस्कार दिला जाईल
४) दादा कोंडके यांच्या नावाने कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार दिला जाईल
५) शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार शिवसेना नेते वामनराव महाडिक यांच्या नावाने दिला जाईल
६) उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार शिवसेना नेते शरद भाऊ आचार्य यांच्या नावाने दिला जाईल
हे पुरस्कार शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर होतील आणि या पुरस्काराचे वितरण शिवसेनेचे मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण होईल, असे सहा प्रमुख ठराव आजच्या पहिल्या सत्रामध्ये पारित करण्यात आलेले आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्याची आज आम्ही शपथ घेतली असून प्रचाराची यंत्रणा फार वेगवान पध्दतीने राबवून योग्य जागा वाटप आणि सर्वाना न्याय देणारा अशा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 48 च्या 48 लोकसभेच्या जागा कोणत्याही परिस्थितीत आम्हीच जिंकू, असा विश्वास सुद्धा यावेळी महा अधिवेशनात व्यक्त करण्यात आल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.
----------------

Comments
Post a Comment