चितोडिया रजपूत लोहार घिसाडी समाज राज्य निमंत्रित मेळावा संपन्न -
राज्यस्तरीय सुकाणू समिती नेमून सोलापूर येथे व्यापक निर्णय घेण्याचा निर्णय - सर्वेक्ष निधीसाठी माजी महापौर आर के पवार यांची एक लाख रुपयांची देगणी
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
राज्यभर विखुरलेल्या चित्तोडीया रजपूत लोहार घिसाडी समाजाचे शास्त्रशुद्ध पणे आणि मान्यताप्राप्त संस्थेमार्फत आर्थिक व सर्वांगीण जनगणना आणि सर्वेक्षण करणे आणि आरक्षण मिळवण्यासाठी समान नाव घेण्यासंदर्भात राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करून त्यामध्ये एकमताने निर्णय घेणे असे ठराव एक मत आहे बालाजी गार्डन येथे झालेल्या समाजाच्या व्यापक मेळाव्यात घेण्यात आले . मुंबई पुणे ठाणे सोलापूर विदर्भ मराठवाड्यातून आलेल्या विविध जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत हे निर्णय घेण्यात आले .
प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत माजी स्थायी समिती सभापती दिलीप पवार यांनी करत या बैठकीतून समाजाला व्यापक दिशा देणारे विचार मंथन होईल आणि त्यासाठी सर्वांनी खुलेपणे आपली मते व्यक्त करावी असे जाहीरपणे नमूद केले . यावेळी राज्यातील विविध भागातून आलेले शिवाजी चव्हाण (परभणी , दिनेश साळुंखे युवराज चव्हाण उमेश चव्हाण ( सातारा ) मनीष पवार ( ठाणे / शिवाजी साळुंखे ( कराड ) पृथ्वीराज पवार इस्लामपूर )सोलापूरचे उद्योजक - संघटक दत्ता पवार - मेढेकर यांच्यासह यांच्यासह शेखर चव्हाण ,आदींनी विविध पैलूंनी आपली मते व्यक्त केली . यावेळी काही प्रतिनिधी नी उत्स्फूर्तपणे घिसाडी भाषेत संवाद साधत त्या भाषेचा एक असणारा बाझही सर्वांना ऐकवला ,त्याचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले . केले . दिवसभर झालेल्या सर्व चर्चा आणि मताचा समग्र आढावा घेत माजी महापूर आर . के .पवार यांनी टाटा सोशल फाउंडेशन सारख्या अधिकृत मान्यता प्राप्त संस्थेकडून आपल्या गाव तालुका पातळीपर्यंत विखुरलेल्या, बांधा ते चांदा पर्यंत कार्यरत असलेल्या राज्यातील समाजाची आर्थिक आणि सांख्यिकी नोंद सर्वेक्षण करून घेणे गरजेचे आहे ,त्यासाठी किमान आठ ते दहा लाख रुपये निधी लागणार आहे आणि त्याची सुरुवात आपण स्वतः एक लाख रुपये देणगी देऊन करत सुरुवात करत असल्याचेसांगितले . यावेळी सर्वांमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील दोन ते तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली एक राज्यस्तरीय सुकामे समिती स्थापन करण्यातही निर्णय घेण्यात आला आणि ही समिती लवकरच सोलापुर येथे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता पवार यांच्या समन्वयाने होणाऱ्या व्यापक बैठकीत समाजाच्या समान नवा संदर्भात संदर्भासह सर्वेक्षणा संदर्भातील निर्णय घेतील त्या सर्वांनी अनुमोदन द्यावे आणि त्याच्या पाठीशी ठाम उभे राहावे असेही एकमताने ठरविण्यात आले . या अत्यंत सूत्रबद्धपणे पार पडलेल्या उपक्रमासाठी स्थानिक संयोजनासाठी माजी महापौर आर के पवार , माजी स्थायी सभापती दिलीप पवार , शहराध्यक्ष युवराज पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहाजी सुर्यवंशी , विक्रम पवार ,उमेश चव्हाण, संजय सुर्यवंशी , हिदुराव पवार , शामराव चव्हाण , अतुल शेलार , श्रीमती चव्हाण , प्रदीप शेलार आदिसह शंभर कार्यकत्यांनी विशेष परिश्रम घेतले . ॥ कोल्हापुरी आदरातिथ्याने भारवले॥ बंद्यापासून चांदया पर्यंत आलेल्या सर्व प्रतिनिधी चे कोल्हापुरी फेटे बांधून आणि गुलाब पुष्पधन केलेले स्वागत आणि खास अस्सल कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्याश्याचं झालेले स्नेहभोजन अशा कोल्हापुरी आदर्श त्यांनी सर्व प्रतिनिधींनी प्रतिनिधी भारावून गेले आणि त्यांनी सर्वांनी तोंड भरून कोल्हापूरच्या संयोजकांचे तोंड भरून कौतुक ही केले .
Comments
Post a Comment